Aditya L-1 Special Report :'आदित्य L-1 चं' यशस्वी प्रक्षेपण, इस्रोच्या शास्त्रज्ञांसह देशभरात जल्लोष
abp majha web team
Updated at:
02 Sep 2023 11:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. भारताच्या महत्त्वाकांक्षी आदित्य एल-१ चं यशस्वी प्रक्षेपण झालंय. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोनं आदित्य एल-१ मोहीम राबवलीय. आदित्य एल-१ चं प्रक्षेपण सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून झालं. सूर्यावरील घडामोडी, चुंबकीय वादळे यांचा आदित्य एल-१ अभ्यास करणार आहे. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी केल्यानंतर संपूर्ण जगाचं इस्रोच्या आदित्य एल-१ मोहिमेकडे लक्ष लागलं होतं. आता आदित्य एल-१ पृथ्वीपासून तब्बल १५ लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहे.