Aanvi Kamdar Death : जीवघेणा रील फॅक्टर, अन्वी कामदारचा मृत्यू Special Report
सध्या सोशल मीडिया हा आपल्या जगण्याचा जणू काही अविभाज्य भाग बनलाय. आणि अनेक इन्फ्लुएन्सरसाठी हाच सोशल मीडिया हे कमावण्याचं साधनही आहे. मात्र रील बनवण्याच्या नादात सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर असणाऱ्या एका तरूणीचा जीव गेलाय... थेट तीनशे फूट खोल दरीत कोसळल्यानं तिचं आयुष्यच संपलंय...
रीलस्टार अन्वी कामदार कोण होती? (Who Is Aanvi Kamdar)
स्क्रीनवर दिसणाऱ्या या मुलीचा चेहरा तुम्ही अनेकदा रील्स स्क्रोल करताना पाहिला असेल. हीचं नावय अन्वी कामदार. ती 27 वर्षांची होती. अन्वी डिजिटल क्रीएटर म्हणून ओळखली जायची, मात्र पेशाने ती CA होती. इन्स्टाग्रावर तिचे 2 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. the glocal journal नावाने तिचं इन्स्टाग्रावर अकाउंट आहे. याच अकाउंटवर ती ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईलसंदर्भात व्हिडीओ पोस्ट करायची. हळूहळू अन्वी नावारुपाला येत होती. देशात परदेशात फिरुन वेगवेगळे व्हिडीओ ती आपल्या अकाउंटवर पोस्ट करत होती. पावसळ्याचा आनंद लुटण्यासाठी नुकतीच ती माणगावच्या कुंभे धबधब्यावर आपल्या 6 ते 7 मित्रांसह गेली होती आणि तिथेच तिला मृत्यूने कवेत घेतलं.