Aaditya Thackeray Special Report : वरळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आता ठाण्याचंही आव्हान
Aaditya Thackeray Special Report : वरळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आता ठाण्याचंही आव्हान
ठाकरेंच्या शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा आव्हान दिलंय. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या सातव्या टप्प्याला इगतपुरी तालुक्यातल्या मुंढेगावातून आज सुरुवात झाली. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आमदारकीचा राजीनामा देऊन ठाण्यातून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं. याआधी चेंबूरमधल्या सभेतही आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देऊन थेट वरळी मतदारसंघात आपल्यासमोर निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर उद्या शिंदे गटाच्या वतीनं आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदेंच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. वरळी कोळीवाड्यातल्या मच्छिमार बांधवांच्या वतीनं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे. या जाहीर सभेच्या निमित्तानं आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधल्या संघर्षाचा दुसरा अंक सुरु होणार का, याकडे राजकीय निरीक्षकाचं लक्ष लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या



























