हरिश्चंद्र गडाच्या 14 वाटांवरचा थरारक अनुभव, विनायक वाडेकर आणि सहकाऱ्यांचा अनोखा विक्रम
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 07 Nov 2021 08:26 PM (IST)
ट्रेकींगसाठी सर्वात सुंदर गड म्हणून हरिश्चंद्रगडाची ओळख आहे. या अजस्र गडावर जाण्यासाठी पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यातून अनेक वाटा आहेत. पण त्यापैकी बहुतेक वाटा फारश्या कोणाला ठाऊक नसतात . मात्र तीन हौशी ट्रेकर्सनी एका स्थानिक आदिवासी तरुणाच्या सहाय्याने हरिश्चंद्रगडावर जाणार्या आणि गडावरून उतरणाऱ्या चौदा वाटा सहा दिवसांत सर करायच ठरवल. यातील प्रत्येक वाटेवर हरिश्चंद्रगडाचं वेगळ सौंदर्य आणि वेगळा थरार त्यांना अनुभवायला मिळला. हरिश्चंद्रगडाची ही वेगळी ओळख एबीपी माझा प्रेक्षकांसाठी.