Mumbai Terrorist Special Report : मुंबईमध्ये पुन्हा एकदा 26 /11 हल्ल्याचा प्लॅन? ABP Majha
हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर एक संशयास्पद बोट येऊन धडकली. त्यात तीन एके-४७ रायफल्स आणि काही बुलेट्सही आढळून आल्या. मग आज पाकिस्तानातल्या एका नंबरवरून मुंबईच्या वाहतूक पोलिसांना आलेला धमकीचा मेसेज आला. या साऱ्या घटनाक्रमानंतर सर्व सुरक्षायंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मुंबईच्या वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज पाठवल्याप्रकरणी विरारमधून एकाला ताब्यात घेण्यात आलंय. पण संबंधित व्यक्तीने आपण धमकीचा मेसेज पाठवला नसल्याची जबानी पोलीस तपासात दिली आहे. मोहम्मद आसिफ असं या २६ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मूळचा राजस्थानमधील बिजनौरचा रहिवासी आहे. आपल्यासोबत हा प्रकार दुसऱ्यांदा घडला असल्याची धक्कादायक माहिती तरुणानं पोलिसांना दिली. तो तरुण सध्या क्राईम ब्रांच पोलिसांच्या ताब्यात असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.
सगळे कार्यक्रम
![Suresh Dhas VS Dhananjay Munde| धनंजय मुंडे विरूद्ध सुरेश धस वादाचा इतिहास काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/248ebc35dd5e5759ee762163c7d9aff31739727442997718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/b2035ff34da147fc633da0268a0057381739644597101718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/1b39cefbf1723e81e588c01588be07451739644329362718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/4a7e5f67717c6f4cfec3cc0dc3174e751739643929956718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/5ee28ac5f68819d7b1c5444f9375be461739643510374718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)