Missing Girls : महाराष्ट्रातून 23 हजार मुली, महिला बेपत्ता, राज्यात महिलांची तस्करी सुरू नाही ना?
abp majha web team
Updated at:
23 Dec 2021 10:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या रोजच्या जीवनामध्ये काही गोष्टीबद्दल आपल्याला काहीच वाटेनासं झाले आहे. महाराष्ट्रामध्ये वर्ष 2020 मध्ये तब्बल 63 हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी जवळपास 24 हजार महिला आणि मुली विषयी गूढ अद्याप कायम आहे. 40 हजार 95 महिला आणि मुली पोलिसांच्या तपासात सापडल्या आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेतील लेखी उत्तरात ही माहिती दिली. या माहितीचा आधार नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल आहे.