Top 100 : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP Majha : 15 Sept 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTop 100 : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP Majha : 15 Sept 2024
विरोधकांनी मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, नागपुरात पत्रकारांच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट.
पंतप्रधान होणं हा माझ्या आयुष्याचा उद्देश नाही, तर विरोधी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांकडून पंतप्रधानपदाचा प्रस्ताव आल्याचाही नितीन गडकरींकडून दावा.
महाविकास आघाडीत जागावाटपावरुन रस्सीखेच नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, संजय राऊतांचं वक्तव्य.
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी, कसबामधील राष्ट्रवादी भवनमध्ये अजित पवार जनता दरबार घेणार
बारामतीमधील अखिल भारतीय तांदुळवाडी वेस या गणपती मंडळाकडून अजित पवारांचे बॅनर, बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख.
मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते लासलगाव मतदारसंघातील ६९४ कोटींच्या रस्त्याचंं उद्घाटन. पिंपळस ते येवला या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी ५६० तर लासलगाव- विंचूर- खेडलेझुंगे या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी १३४ कोटींचा निधी
मी भाजपमध्ये जाणार नाही, मी काँग्रेसमध्येच राहणार, 'मी विकासकामासाठी नितीन गडकरींना भेटलो, यात राजकीय चर्चा नाही', काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांचं स्पष्टीकरण.