Top 100 Headlines : सकाळच्या महत्त्वाच्या शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 02 Jan 2025 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. मात्र याबाबत अद्याप घोषणा झाली नसल्याचे गडकरींचं स्पष्टीकरण.
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं बीड प्रकरणावरून मोठं वक्तव्य.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना, आयपीएस डॉक्टर बसवराज तेलींच्या अध्यक्षतेखालील पथकाकडून होणार तपास. यामध्ये एकूण १० अधिकाऱ्यांचा समावेश.
संतोष देशमुख हत्याप्रकणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर ३०७ चा गुन्हा तर फरार कृष्णा आंधळेवरही धारूर पोलीस ठाण्यात ३०७ चा गुन्हा दाखल असल्याची सूत्रांची माहिती, याप्रकरणी सीआयडीकडून आतापर्यंत १३० जणांची चौकशी.
बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, आजच अचानक पलंग कसे मागवले? रोहित पवारांचा सवाल, पलंग स्टाफसाठी असतील तर एवढीच तत्परता सगळ्या स्टाफसाठी दाखवा, पवारांची एक्स पोस्ट.
बीड पोलीस स्टेशनमध्ये पलंग का आणले?, विजय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा सवाल.
बुलढाण्यातली कळंबेश्वर गावात अवैध धंदे बंद केल्याने संतापलेल्या गावगुंडांचा सरपंच पतीवर प्राणघातक हल्ला, अवैध धंदे सुरू करू न दिल्यास तुझा मस्साजोगचा सरपंच करु, सुभाष खपरद यांना धमकी देत केला हल्ला, ५ जणांवर गुन्हा दाखल.
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, आज दुपारी १२ वाजता मंत्रालयात बैठक, बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता.
आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार नाहीत, आज रात्री उशिरा अजित पवार परदेशातून मुंबईला परत येतील.
महामंडळाकडून १५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव, आज मंत्रिमंडळ याला मान्यता देतं का याकडे लक्ष