Maharashtra Cabinet Meeting : शंभर दिवसांचा रोड मॅप, खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक

Continues below advertisement

विस्तार आणि खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक, शंभर दिवसांचा रोड मॅप आणि प्रस्तावित एसटी भाडेवाढीवर निर्णय अपेक्षित

राज्य मंत्रिमंडळाची आज 12 वाजता बैठक पार पडणार आहे. खातेवाटपानंतर ही पहिलीच बैठक असणार आहे. दुपारी बारा वाजता मंत्रालयात कॅबिनेट बैठक होईल. अनेक महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत होतील अशी शक्यता आहे.  शंभर दिवसांचा रोड मॅप संदर्भात मुख्यमंत्री प्रत्येक विभागाचा आढावा घेत आहेत, यावरही आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होईल. सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचं म्हणजे एसटी भाडेवाढीच्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष आहे. महामंडळाने १५ टक्के भाडेवाढचा प्रस्ताव मांडलाय. आज मंत्रिमंडळ याला मान्यता देतं का याची उत्सुकता आहे. त्याचबरोबर राज्यात गाजत असलेल्या मस्साजोग हत्या प्रकरणावरही आज चर्चा होण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram