Saat Barachya Batmya : 7/12 : बोगस बियाणे खते कीटकनाशके विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा बडगा
abp majha web team
Updated at:
22 Jul 2023 09:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकृषी विभागाने बोगस बियाणे खते कीटकनाशके विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 19 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये बियाणे विक्रीचे 11, किटकनाशके विक्रीचे सहा तर खत विक्रीचे दोन परवान्यांचा समावेश आहे. याबरोबरच बियाणे, कीटकनाशके आणि खतांच्या 60 दुकानांना विक्री बंदचे आदेश दिले आहेत. जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडून 15 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकानं बियाणे कीटकनाशके आणि खतांचे जवळपास साडेतीन हजारावर तपासण्या केल्या आहेत. त्यातील 700 पेक्षा जास्त नमुने तपासणीसाठी काढले आहेत