Majha Vishesh | अर्णबच्या जामीनाचा न्याय अन्य बंदी कार्यकर्ते - कलाकारांना मिळेल? माझा विशेष
एबीपी माझा वेब टीम | 12 Nov 2020 05:57 PM (IST)
नवी दिल्ली: उच्च न्यायालयाच्या वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारण्यांच्या प्रकरणात सातत्याने वाढ होत असल्याचे ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अशा प्रकरणात जामीन नाकारणे म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार आहे, म्हणून या प्रकरणात हस्तक्षेप करत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं होतं. तसेच या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना जामीन नाकारण्यात उच्च न्यायालयाची चूक झाल्याचेही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने सांगितलं.