Caste Validity Certificate | प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची कसरत, शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी धावपळ!
abp majha web team Updated at: 08 Jul 2025 05:02 PM (IST)
महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक शहरांमधील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयांमध्ये पालक आणि विद्यार्थी रांगा लावून उभे आहेत. एमसीएस सीईटीसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख उद्या आहे. तसेच सिटी सेलमधून प्रवेश होण्यासाठी देखील एक ते दोन आठवडे लागतील. या कालावधीमध्ये प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत सुरू आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे. जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी विभागीय सहायक विभाग कार्यालयांमध्ये पालकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. एका पालकाने सांगितले की, "मला जातीचे दाखल्याची पडताळणी करायची आहे आणि दोन तीन चक्र मारले आहे फेब्रुवारीपासून. तरी आता इथे क्युरे आलीय काल. मेसेज आलाय की तुमच्या १९५०पूर्वीचा जात नियाय नाशिकचा पुरावा पाहिजे. तर तो पुरावा तर काही भेटत नाही आणि कॉलेज मध्ये आता अडमिशन प्रक्रिया चालू आहे. ही प्रक्रिया चालू असल्यामुळे पेपर ही काय भेटत नसतील आणि हे पेपर जर नसतील तर प्रत्येक वर्षी दीड लाख रुपये खर्च येईल असं एक अंदाज आहे." प्रवेश प्रक्रिया सुरू असल्यामुळे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. तांत्रिक अडचणींमुळे पालकांना आणि अर्जदारांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.