Sudhir Mungantiwar Majha Katta | मंत्रिपद कुणामुळे गेलं, रोख कुणाकडे, मुनगंटीवार 'माझा कट्टा'वर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSudhir Mungantiwar Majha Katta : लोकसभेत पराभव झालेल्या इतरांना मंत्रिपदं मिळाली, पण आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही यामागे निवडणूक लढवण्यास जाहीर अनुत्सुकता दाखवल्याची शक्यता असेल असं भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी काही तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तशी शक्यता बोलून दाखवल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. राज्यमंत्रिमंडळातून डावलल्यानंतर सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्या सर्वांवर सुधीर मुनगंटीवार यांनी दिलखुलास चर्चा केली.
मंत्रिपद जाण्यामागे लोकसभा निवडणूक?
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "लोकसभा लढण्याची माझी इच्छा नव्हती. पण मंत्रिपद मिळालं नाही यामागे निश्चित काय कारण आहे हे मला माहिती नाही. दिल्लीत मंत्रिपद देताना काय विचार केला जातो हे मला माहिती नाही. पक्षासाठी जर हे योग्य असेल तर ते स्वीकारावं लागेल. मला अर्थमंत्री म्हणून संधी मिळाली. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं. मी प्रदेशाध्यक्ष असताना खडकवासला, अमरावती पदवीधर, शिक्षक मतदारसंघ, भंडारा गोंदीया जिल्हा परिषदा जिंकल्या. कदाचित दुसऱ्यांना संधी देण्यासाठी पक्षाने विचार केला असेल. पण ही माझ्यासाठी चांगली संधी आहे. आपल्यातील उणिवा लक्षात येतात. कदाचित अजून काही संधी मिळाली तर तीही आनंदाने पार पाडेन."