Santosh Deshmukh Case | बीड संतोष देशमुख हत्याकांड काय घडलं, कसं घडलं? Special Report

Continues below advertisement

९ डिसेंबरला केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि नंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली... जसजसे या घटनेतील बारकावे समोर येत गेले तसे त्याचे पडसाद राज्यभर दिसू लागले सत्ताकारण, पवनचक्क्यांचं अर्थकारण, मान-अपमान, आरोप प्रत्यारोप, बदल्याची भावना, जातकारण, राजकारण, असे विविध पैलू या निमित्तानं समोर आले. या प्रकरणाचा तपास शेवटच्या टप्प्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी पवनचक्की प्रकल्पावर झालेला वाद कारणीभूत असल्याचं बोललं गेलं. मस्साजोगच्या पवनचक्की साईटवर गेलेल्या अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांना सरपंच संतोष देशमुख आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण करत पिटाळून लावले.. त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले.. घुलेंसह चौघांवर पोलिसांमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला.  या घटनेचा राग डोक्यात ठेवून घुले आणि त्यांच्या ६ साथीदारांनी कंपनीने सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण केलं आणि नंतर निर्घृण पद्धतीने जबर मारहाण केली, त्यात संतोष देशमुख यांचा बळी गेला.

या निर्घृण हत्याकांडाची माहिती, घुलेंसह त्यांच्या ६ साथीदारांनी केलेले भयंकर प्रकार आणि त्यासोबत काही अफवा सुद्धा बीडमध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरल्या. अनेक ठिकाणी मोर्चे निघाले, लोकांनी उत्सुफुर्त बंद पाळला. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर अपहरण आणि खंडणी प्रकरणात सामील असल्याचा आरोप करण्यात आला आणि तिथून या प्रकरणात राजकारणाने वेग घेतला. या प्रकरणाचा तपास विशेष यंत्रणेमार्फत व्हावा अशी मागणी भाजप आमदार पंकजा मुंडेंनी केली तर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सुद्धा एसआयटीची मागणी केली. विविध पक्षांचे नेते मस्साजोग मध्ये दाखल होऊ लागले. देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करत असतानाच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेवर टीका सुद्धा वाढू लागली.

 

हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत होते तर हत्येचा आरोप असलेले एक आरोपी विष्णू चाटे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे.. चाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर राष्ट्रवादीने विष्णू चाटे याची पक्षातून हकालपट्टी केली.. राजकारणाप्रमाणेच या प्रकरणाकडे जात वर्चस्वाच्या अँगलनेही बघितलं जाऊ लागलं. बीड जिल्ह्यातील आणि त्यातही परळीतील मराठा-वंजारा संघर्षाची किनार त्याला कारणीभूत ठरली. त्यातच मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षण आंदोलन आणि लोकसभा निवडणुक काळात दोन समाजातील दरी वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर या हत्या प्रकरणाकडे आणि आरोप प्रत्यारोपाकडे बघितलं जाऊ लागलं. वाल्मिक कराड यांना हत्या प्रकरणात आरोपी करण्यासाठी दबाव वाढू लागला तसा त्यांच्या समर्थनातही समाज रस्त्यावर उतरला. ((15-Ahn-Protest For Karad)) राजकीय आकसापोटी वाल्मिक कराड यांना अडकवलं जातंय असा सूरही उमटला.

हे सगळं एकिकडे सुरु असतानाच नवीन फडणवीस सरकारचं कामकाज सुरु झालं होतं.. राजकीय घडामोडीही वेगात सुरु होत्या.. धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश करु नये यासाठी विरोधक आग्रही होते. मात्र सगळा दबाव झुगारत फडणवीस आणि अजितदादांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं.. आणि दुसऱ्या दिवशी नागपुरात विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले.. आत्तापर्यत बाहेर सुरु असलेले आरोप प्रत्यारोप सभागृहात पोहोचले. भाजप आमदार सुरेश धस, पवारांचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मस्साजोग प्रकरणी सभागृहात सनसनाटी आरोप करत अधिवेशनाची सुरुवात वादळी केली.

घटनेचं गांभीर्य लक्षात घेत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीची हमी दिली. तपास सीआयडीकडे दिला जाईल अशी ग्वाही दिली.
त्यानंतर पुढचे काही दिवस मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चारी बाजुंनी हल्ले सुरुच राहिले. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण राज्यपातळीवर नेण्यात भाजप आमदार सुरेश धस यांचा मोठा वाटा..सुरेश धस यांनी वाल्मिक कराड तसंच आपल्याच सरकारमधील मित्रपक्षाचे मंत्री धनंजय मुंडेंना थेट टारगेट केलं. सुरेश धस यांनी कारण नसताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं नाव घेतल्यानं प्राजक्ता माळीला नाहक मनस्ताप सहन करावा लागला तसंच मूळ हत्याकांडाचा मुद्दा रुळावरुन घसरतो की काय अशी शंकाही आली.
मात्र सुरेश धस सावरले.. त्यांना भाजप प्रदेशाध्यक्षांनी समजही दिली.
गोविंद शेळकेसह आफ्ताब शेख, एबीपी माझा बीड

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram