Bageshwar Baba : बागेश्वरबाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, विभुती घेण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी!

Bageshwar Dham, Bhiwandi : बागेश्वर महाराज (Bageshwar Dham) म्हणजेच धीरेंद्र शास्त्री (Bageshwar Baba) आज (दि.4) भिवंडीतील मानकोली नाका येथे इंडियन ऑयल कंपनीच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ झालाय. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांवर लाठीचार्ज करण्याची वेळ आलीये. धीरेंद्र शास्त्री (Bageshwar Baba) यांनी आपल्या भक्तांना अंगारा देण्याचे सांगितले. त्यांनी आधी महिलांना, त्यानंतर पुरुषांना एका रांगेत येण्याचे आवाहन केले. मात्र, काही वेळातच गर्दीचा ताण वाढत गेला, आणि अंगारा घेण्यासाठी लोक एकमेकांच्या अंगावरुन पुढे जात असल्याची स्थिती निर्माण झाली.

गोंधळ झाल्यानंतर बागेश्वर बाबांनी स्टेज सोडला 

अधिकची माहिती अशी की, गर्दीचा ताण वाढल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी लोकांना सावरण्याचा प्रयत्न केला. काही महिलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना बाजूला नेण्यात आले. यानंतर, धीरेंद्र शास्त्री यांनी परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून स्टेज सोडला. त्यानंतरही लोक स्टेजवर जाण्यासाठी धावले, ज्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola