Majha Katta Datta Gandhi : माझा कट्टा : 100 वर्षांचे लढवय्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता गांधी
abp majha web team
Updated at:
18 Jun 2022 11:12 PM (IST)
Majha Katta Datta Gandhi : वयाने,मानाने आणि कामानं प्रचंड ज्येष्ठ असलेले, कर्मयोगी दत्ता गांधी आपल्या कट्ट्याचे पाहुणे आहेत. समाज कल्याणासाठी एखाद्या व्यक्तीने किती निःस्वार्थ आणि निरपेक्ष भावानं काम करावं याचं ते सर्वोत्तम उदाहरण आहेत. आपण सर्वसामान्य माणसं साधारणतः वयाच्या पन्नाशी, साठीपर्यंत नोकरी करतो, आपली सेवा बजावतो. पण गांधी सरांनी आपल्या आयुष्याच्या १०० वर्षांच्या टप्प्यावरही देशसेवा, समाजसेवेचा वसा सोडलेला नाही. वयाच्या अगदी विशीत असताना त्यांनी चलेजाव आंदोलनात उडी घेतली. मग संयक्त महाराष्ट्राच्या चळवळीसह अनेक चळवळींमध्ये ते सहभागी झाले. राष्ट्रसेवा दलाचं काम त्यांनी तळागाळात पोहोचवलं. वंचितांचा शोषितांचा आवाज बनले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या.