Mahant Namdev Shastri on Majha Katta :धनंजय की पंकजा; भगवान गडाचा आशीर्वाद कुणाला? महंत माझा कट्टावर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahant Namdev Shastri on Majha Katta :धनंजय की पंकजा; भगवान गडाचा आशीर्वाद कुणाला? महंत माझा कट्टावर काही लोकांनी अध्यात्माच्या नावाखाली विज्ञानाला बदमान केलं असल्याचे मत भगवानगडाचे महंत आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक नामदेवशास्त्री (Namdev Shastri) यांनी व्यक्त केलं. आज आपण विज्ञान हा शब्द वापरतो, पूर्वीच्या काळात अध्यात्म हा शब्द वापरला जात होता असे ते म्हणाले. ज्याला संत व्हायचंय त्यानं आधी वैज्ञानिक होणं ही ज्ञानेश्वर महाराजांची अट आहे. अध्यात्म ही विज्ञानाची जननी असल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले. ज्ञानेश्वरी आणि गाथ्यानं मराठी जीवंत ठेवल्याचे नामदेव शास्त्री म्हणाले. नामदेवशास्त्री यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते. कोणत्याही संतांनी अंधश्रद्धा मानली नाही. सगळ्या संतानीअंधश्रद्धेच्या विरोधात काम केल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले. ज्ञानेश्वरीत 90 टक्के विज्ञान आहे. 100 टक्के लोक ज्ञानेश्वरीवर विश्वास ठेवतात पण समजणारे एक टक्का पण नाहीत. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं जातं पण त्याचा अर्थ लावला जात नाही असे नामदेवशास्त्री म्हणाले. ज्ञानेश्वरी हा पृथ्वीवरील एकमेव ग्रंथ असा ही आहे की, ज्यामध्ये पृथ्वीवरील सगळे विषय एकत्र आले आहेत असे नामदेवशास्त्री म्हणाले.