Bachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहिती

Continues below advertisement

Bachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहिती

विधानसभा निवडणूक मतदानाच्या एक दिवस आधी विरारमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. एका हॉटेलमध्ये भाजपाचे नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला. यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावेळी कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये मोठा गोंधळ घातला. भाजपा आणि बविआ कार्यकर्ते आपापसांत भिडल्याचंही पाहायला मिळालं . हा सर्व प्रकार जवशपास चार तास सुरु होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत केलं. या संदर्भातील काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, या प्रकरणानंतर विरोधकांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे, तर हे आरोप भाजपाकडून फेटाळण्यात आले आहेत. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘विनोद तावडे यांच्याकडे कोणतेही पैसे सापडलेले नसून या प्रकरणात ते कुठेही दोषी नाहीत. त्यांनी कुठलेही पैसे नेलेले नव्हते. तसेच कोणतेही पैसे वाटलेले नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram