Arvind Kejriwal on Majha Katta :आगामी निवडणुकींसाठा काय असेल अरविंद केजरीवाल यांची रणनीती?माझा कट्टा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppArvind Kejriwal on Majha Katta : भारतात महत्त्वांच्या पाच राज्यांतील निवडणूका तोंडावर आल्या आहेत. दरम्यान यावेळी पंजाब आणि गोवा या राज्यांमध्ये आम आदमी पार्टी अर्थात आप निवडणूक लढवणार आहे. दरम्यान या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांंनी एबीपीच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात आगामी निवडणूकांबाबत आपली रणनीती सांगताना विविध सर्व्हेंमधून पंजाबचं पारडं जड का आहे? यामागील कारणही सांगितलं आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने काही महिन्यांपासून प्रचाराला सुरूवात केली आहे. लोकांच्या घरोघरी जाऊन आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते प्रचार करत असल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब दौऱ्यावर देखील जाऊन आले. दरम्यान आता त्यांनी माझा कट्टावर बोलताना पंजाबमध्ये आप पार्टीचं सरकार येण्यामागे काय नेमकं कारण आहे? हे देखील सांगितलं आहे. ते म्हणाले, ''पंजाबमध्ये अकाली दल, काँग्रेस सरकार करत असलेल्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली असून आता त्यांच्याकडे आम आदमी पार्टीसारखा पर्याय असल्याने ते आम्हाला निवडून देणार आहेत.'' तसंच आम्ही दिल्लीमध्ये अवघ्या पाच वर्षात शाळा, रुग्णालयं अशा विविध सोयीसुविधा केल्या आहेत. या सोयी सरकार मागील 70 वर्षे देखील पुरवू शकले नाहीत, अशी टीका देखील केजरीवाल यांनी केली आहे.