Majha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 21 March 2024 : Maharashtra News : ABP Majha

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीड जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी आणखी एका टोळीवर केली मकोका अंतर्गत कारवाई. सहा जणांच्या या टोळीत तीन महिलांचाही समावेश. टोळीतील तीन जण फरार.
बीडमधील शिक्षक धनंजय नागरगोजेंच्या आत्महत्येनंतर सुप्रिया सुळेंकडून कुटुंबीयांना मदत, नागरगोजेंच्या मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच त्यांच्या पत्नीला रोजगार मिळवून देण्याचाही दिला शब्द.
चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी बुकींगमध्ये १६ कोटींचा अपहार करणाऱ्या दोघांची संपत्ता ईडीकडून जप्त, ऑनलाईन तिकीट बुकिंग करणाऱ्या रोहीत आणि अभिषेक ठाकूरनं केला होता गैरव्यवहार.
जेजुरी नगर परिषदेकडून वाद्यं वाजवून मालमत्ता कराची वसुली. मालमत्ता कर आणि थकबाकी वसुलीसाठी पालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी गेल्या १५ दिवसांपासून शहरात फिरतायत. स्पीकरवर मालमत्ता कर भरण्यासाठी केलं जातंय आवाहन.
सोलापूर आयटीआयच्या निधी अभावी अपूर्ण राहिलेल्या वसतिगृहाचा वापर जुगार आणि अश्लिल कृत्यांसाठी, हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनानं तत्काळ दखल घेण्याची स्थानिकांची मागणी.
जालन्यात वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापणाऱ्य़ाला पोलिसांनी केली अटक. त्याच्याकडील दोन तलवारीही केल्या जप्त.
नाशिकमधील सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल व्यावसायिकाला टोळक्याची लाथाबुक्क्यांनी मारहाण. हॉटेलसमोरील पान टपरी चालकांकडून वस्तू खरेदी करून पैसे न दिल्यानं जाब विचारला असता केली मारहाण.
कोल्हापूरमध्ये घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना अटक, दोघांकडून दहा लाखांचा मुद्देमाल जप्त.
सोलापुरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल. आरोपी ओंकार नलावडेला पोलीस स्टेशनला आणले जात असताना त्याने पोलिसांवर केला हल्ला. ओंकारवर गुन्हा दाखल.