Nagpur Rada Mastermind : कोण आहे नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड? ते अकाउंट कोणाचं?

Nagpur Rada Mastermind : कोण आहे नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड? ते अकाउंट कोणाचं?

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन सोमवारी नागपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर आता राजकीय क्षेत्रात त्याचे पडसाद उमटत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आक्रमक हिंदुत्त्वाचे नवे आयकॉन आणि चेहरा होऊ पाहत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समज दिल्याची माहिती समोर आली आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मंगळवारी मुंबईत विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना पुढील काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.  देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर नितेश राणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही भेटले. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola