Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 05 Jan 2025 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 05 Jan 2025 : ABP Majha
बीड सरपंच हत्या प्रकरणी अधिकाऱ्यांनी आरोपींचा १५ दिवसांचा पीसीआर मागितला, देशमुखांच्या अंगावर अनेक जखमा, हे एकाचं काम नाही, सरकारी वकीलांचं मत.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी.
बीड सरपंच हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेण्याची कोर्टाला विनंती केलीय, आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी सरकारची भूमिका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया.
विरोधक आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. बीड हत्या प्रकरणी संजय शिरसाट यांचा आरोप. राजकीय वरदहस्त आहे की नाही हे तपासात समोर येईल असंही शिरसाटांकडून स्पष्ट.
बीड सरपंच हत्या प्रकरणी आरोपी २८ तारखेपर्यंत रुग्णालयात उपचार घेत होते, संदीप क्षीरसागर यांची माहिती.
बीडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकांची बजरंग सोनवणेंच्याविरोधात पोलीस प्रेस गृपवर वादग्रस्त पोस्ट, सोनवनेंकडून गणेश मुंडे आणि दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे कॉलरेकॉर्ड तपासण्याची मागणी.