Majha Gaon Majha Jilha : तुमच्या गावातील बातम्या एका क्लिकवर : माझा गाव माझा जिल्हा : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajha Gaon Majha Jilha : तुमच्या गावातील बातम्या एका क्लिकवर : माझा गाव माझा जिल्हा : ABP Majha
मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शरद पवार पक्ष आक्रमक, बारामतीत आज सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेबाबत ठाकरे गटाचं कोल्हापुरात निषेध आंदोलन, राजमुद्रेला दुग्धाभिषेक करत केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी.
शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवप्रेमी आणि मराठा बांधवांनी नोंदवला निषेध, लोणावळा शहर पोलीस स्टेशनला शिवभक्तांंकडून निवेदन.
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ हिंगोलीत सरकारच्या विरोधात आंदोलन, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काळे फुगे हवेत सोडत निषेध.
धाराशिवमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक करत सिंधुदुर्गातील घटनेचा निषेध, घटनेच्या निषेधार्थ शिवप्रेमींकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
सिंधुदुर्गात काल झालेल्या घटनेवर पालघरमध्ये ठाकरे गटाकडून निषेध आंदोलन, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी.
बीडच्या अंबाजोगाईतील शासकीय स्वराती नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं बेमुदत उपोषण, मानसिक त्रास, अत्याचार आणि जातिवाद करणाऱ्यांची तात्काळ प्रशासकीय बदली करा, विद्यार्थ्यांची मागणी.
संभाजीनगरच्या सिल्लोड शहरात मुस्लिम समाजाचा आक्रोश मोर्चा, रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन, रामगिरी महाराजांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी.