#MarathaReservation साताऱ्यातील मराठा गोलमेज परिषदेत शिवेंद्रराजे भोसलेंची रोखठोक भूमिका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Nov 2020 07:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसातारा : मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समितीच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची गोलमेल परिषद पार पडली. या गोलमेज परिषदेमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.
मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या परिषदेत शिवेंद्रराजे भोसले यांनी पानिपतचा दाखला देत मराठा समाजाने एकत्र आले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊनच लढा दिला पाहिजे, असं सांगत एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलली ही मराठ्यांची ताकत आपण दाखवून दिल्याच सांगत आम्हाला आरक्षण देताना इतर समाजाचे आरक्षण काढून आम्हाला आरक्षण नको अशी भूमिका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.