Global Climate Strike | जगभरात आज ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक, पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगांवरकरांसोबत बातचीत | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Sep 2019 01:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज भारताबरोबरच जगात एका चळवळीला सुरूवात होतीये. ज्याचं नाव आहे ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक. ही चळवळ आकाराला येण्यामागची व्यक्ती ही कुणी राजकीय नेता नाही, बलाढ्य उद्योगपती नाही, किंवा बलाढ्य देशाचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा नाही . तर यामागे आहे एक मुलगी. जिचं नाव आहे ग्रिटा. आता या ग्रिटाची मागणी अगदी साधी सरळ सोपी आहे. आम्हाला जगण्यासाठी पोषक हवा, पर्यावरण द्या.
आता या मागणीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. कारण ग्लोबल असा जरी उल्लेख या चळवळीच्या नावात असला तरी मुंबईत आरेपासून ते अगदी रेल्वेट्रॅक्सवरून गोळा केलेल्या १६ हजार किलो कचऱ्याच्या बातमीपर्यंत, आपण रोज कशात जगत आहोत याचा गांभिर्यानं विचार करण्याची आजची वेळ आहे. आजच्या या चळवळीची व्याप्ती इतकी मोठी आहे, की बराक ओबामांपासून ते संयुक्त राष्ट्र, हजारो संशोधक, वैज्ञानिक, आणि तरूणाई आत्ता या तासाला ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक करत आहे.. तर यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगांवरकर सर.