TOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 August 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतानाजी सावंतानंतर आता भाजपच्या गणेश हाकेंचा राष्ट्रवादीवर हल्ला, असंगाशी संग झाला असं गणेश हाकेंचं वक्तव्य..राष्ट्रवादीबरोबरची युती दुर्दैवी अशीही टीका..
भाजपनं दीडशे जागांचा आग्रह धरल्यानं महायुतीचं जागावाटप रखडलं...अजित पवार ६० जागांसाठी तयार, एबीपी माझाला सूत्रांची माहिती
तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांचं समन्स, तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत बोलवल्याची माहिती.
माझा राजीनामा मागितला नाही तर विरोधकांना अपचन होते, देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांच्या मागणीवर टीका...
लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांचं राजकारण, सर्व योजना बंद पाडण्यासाठी काँग्रेसचा नेता हायकोर्टात..नागपूरमधल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल...
संजय राऊतांपासून माझ्या जीवाला धोका, स्वप्ना पाटकर यांची ईडीकडे पत्राद्वारे तक्रार, जबाब बदलण्यासाठी धमकावत असल्याचा आरोप...
मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरणी चेतन पाटीलला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी.. तर शिल्पकार जयदीप आपटे अद्याप फरार
नारायण राणेंच्या धमकावणीची पंतप्रधान मोदींकडे तक्रार, माजी खासदार विनायक राऊत यांचं पत्र