वॉशिंग्टन : आयफोन (Iphone) संदर्भात अनेक किस्से (Apple Mobile Phone) आपण आतापर्यंत ऐकले आहे. महागड्या आयफोनला अनेक जण सोन्यासारखं जपतात मात्र हाच आयफोन 16000 फुटावरुन आणि तोही (Alaska Airline Accident) विमानातून पडला, असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर ते खरं वाटणार नाही मात्र विमान प्रवासादरम्यान दरवाजाचा प्लग तुटून थेट आयफोन 16000 फूट खाली पडल्याची घटना वॉशिंग्टन शहराजवळील परिसरातून समोर आली आहे. अलास्का (Alaska Airline) कंपनीचं हे विमान होतं. याच विमानातून आयफोन नेमका कसा खाली पडला?  तो वॉशिंग्टनमधील नागरिकांला नेमका कसा मिळाला? पाहुयात...


नेमकं काय घडलं? (Alaska Airline Accident)


5 जानेवारी म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी जेव्हा अलास्का एअरलाइन्सचे पोर्टलॅंड ते ऑंटेरियो प्रवास करणारे एक प्रवासी विमान 16000 फुटांवर प्रवास करत असताना विमानाच्या दरवाजाचा प्लग अचानक तुटला.  त्यावेळी विमानातून अनेक वस्तू एअर प्रेशरमुळे विमानातून बाहेर पडल्या. त्यात एका iPhone चा देखील समावेश होता. 16000 फुटांवरून पडून सुद्धा फोन सुरक्षित असल्याचं वॉशिंग्टनमधील नागरिकांनी सांगितलं आहे. 


iPhone कसा सापडला?


वॉशिंग्टनचे रहिवासी असलेले सीन बेट्स यांनी रविवारी ट्विटकरत त्यांना रस्त्याच्या कडेला एक iPhone सापडल्याची माहिती दिली. हा iPhone होता जो शुक्रवारी घडलेल्या अलास्का एअरलाइन्सच्या  ASA1282 या विमानदुर्घटनेशी संबंधित होता. तब्बल 16000 फुटांवरून पडून देखील हा iPhone व्यवस्थितपणे काम करत होता. हा मोबाईल Airplane मोडमध्ये  होता. आयफोनला पासवर्ड नसल्याने या नागरिकाने हा फोन ओपन करुन फोन मालकाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात फोन ओपन केल्यानंतर त्यात विमान प्रवासाची माहिती दिसली. त्यावरुन या नागरिकांनी थेट NTSB (नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड) आणि फेडरल एजन्सीला फोन करुन माहिती दिली. त्यावेळी एजंटने हा फोन विमानातून पडला असल्याचं नागरिकाला सांगितलं. त्यावेळी हा आयफोन 16000 फुटावरुन पडूनही सुरक्षित असल्याचं ऐकून एजंट अवाक झाला. या आयफोनचा मालक नेमका कोण आहे, याची अजून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या घटनेवरुन आयफोची सिक्युरिटी आणि त्याच्या संदर्भात कंपनीने केलेले दावे खरे ठरले आहेत. 


16000 फुटांवरून पडला पण साधी...


आयफोन तब्बल 16000 फुटांवरून पडूनसुद्धा फोन चांगल्या स्थितीत होता. या फोनचं कोणतंही नुकसान झालं नाही. या फोनला साधा  एक स्क्रॅच देखील पडला नव्हता, यामुळेच सीन बेट्स यांनी केलेले ते ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.आयफोनचे हे कोणते मॉडेल आहे याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नसली तरी,  ट्विटरवर या व्यक्तीने शेअर केलेले फोटो पाहता हा फोन iPhone 13 किंवा iPhone 14 असल्याचे दिसत आहे. 


विमानाचे इमर्जन्सी लँडिंग 


अलास्का एअरलाइन्सच्या बोईंग 737 मॅक्स 9s या विमानातील हा सर्व प्रकार आहे. या विमानात 147 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते, या प्रकारामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करत विमानातील सर्व प्रवाश्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सगळे प्रवासी सुखरुप असल्याची माहिती विमान कंपनीकडून देण्यात आली आहे. 










इतर महत्वाची बातमी-


WhatsApp Security Tips : 'या' तीन प्रकारे सुरक्षित करा तुमचं Whatsapp अकाऊंट, नाहीतर पर्सनल डेटा गेलाच म्हणून समजा!