Swiggy in Train : भारतात सर्वाधिक प्रवास ट्रेनने केला जातो. सुरक्षित प्रवासासाठी ट्रेन हा उत्त्म मार्ग आहे. तसेच अनेकांना परवडणाराही आहे. पण, याट ट्रेनने जेव्हा लांबच्या पल्ल्याचा प्रवास केला जातो तेव्हा तो मात्र अनेकांसाठी हेक्टिक होतो. कारण ट्रेनमध्ये निर्माण होणारा अन्नाचा प्रश्न. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या लोकांना ट्रेनमध्ये चांगलं जेवण मिळत नाही. पण आता तुमची ही समस्या लवकरच दूर होणार आहे. याचं कारण म्हणजे, ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप Swiggy ने IRCTC सोबत भागीदारी केली आहे. यामुळे आता ट्रेनमधून प्रवास करतानाही प्रवाशांना स्विगी ॲपद्वारे त्यांचे आवडते खाद्यपदार्थ थेट चालत्या ट्रेनमध्ये त्यांच्या सीटवर पोहोचवता येणार आहेत. ही नवीन सुविधा नेमकी कशी काम करेल? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहेत.
स्विगी ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ पोहोचवणार
इंडियन रेल्वे केटरिंग आणि टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC आणि स्विगी यांनी एकत्रितपणे धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना त्यांच्या सीटवर त्यांचे आवडते खाद्यपदार्थ पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या ही सुविधा फक्त 4 स्टेशन्सवर सुरू करण्यात आली आहे. यामध्ये बेंगळुरू, भुवनेश्वर, विजयवाडा आणि विशाखापट्टणमचा समावेश आहे. मात्र, येत्या काही दिवसांत ही सुविधा भारतातील अन्य स्टेशन्सवरही सुरु होऊ शकते असं सांगण्यात येत आहे.
तसेच, भारतीय रेल्वे अन्नपदार्थ आणि पर्यटन महामंडळाने ट्रेनमधील प्रवाशांना जेवण देण्यासाठी फूड डिलीव्हरी ॲपशी हातमिळवणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. IRCTC ने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये Zomato सोबतसुद्धा भागीदारी केली होती, जी भारतातील अनेक स्थानकांवर फूड डिलीव्हरीची सेवा प्रदान करते.
ऑर्डर कशी कराल?
जे प्रवासी IRCTC द्वारे ऑनलाईन तिकीट बुक करतात ते IRCTC ई-कॅटरींग पोर्टलद्वारे त्यांचा PNR क्रमांक एन्टर करून ट्रेनमधून प्रवास करताना सहजपणे जेवण ऑर्डर करू शकतात. या वेळी, प्रवासी त्याच ॲपमध्ये रेस्टॉरंटचे नाव, खाद्यपदार्थ एन्टर करू शकतात किंवा त्यांच्या कोणत्याही आवडत्या रेस्टॉरंटमधून अन्न ऑर्डर करू शकतात. प्रवासी जेवणासाठी ऑनलाईन किंवा कॅश ऑन डिलिव्हरी देखील देऊ शकतात. अशा प्रकारे ही सेवा कार्यरत झाल्यानंतर अनेक प्रवाशांच्या जेवणाचा प्रश्न तर सुटेलच पण त्यांना त्यांच्या आवडीचं अन्नही खाता येईल.
महत्त्वाच्या बातम्या :