UPI Payment : यूपाआय पेमेंट (UPI Payment) भारतात सगळीकडे चालतं. यामुळे आपली अनेक कामं अगदी सहज पूर्ण होतात. पण, जेव्हा आपण परदेशात जातो. तेव्हा मात्र, सर्वात मोठी समस्या पेमेंटची असते. पण, ही समस्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI ने सोडवली आहे. आता ही सेवा भारताव्यतिरिक्त अनेक देशांमध्ये उपलब्ध आहे.


या ठिकाणी आम्ही तुम्हाला परदेशात पेमेंटसाठी तुमचा UPI कसा अॅक्टिव्ह करू शकता ते सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहोत. 


UPI पेमेंट कसा अॅक्टिव्ह कराल?


जर तुम्हाला PhonePe वर UPI इंटरनॅशनल अॅक्टिव्ह करायचं असेल तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.



  • सर्वात आधी, UPI ॲप ओपन करा आणि तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.

  • आता पेमेंट सेटिंग्जमध्ये जा आणि UPI इंटरनॅशनल सिलेक्ट करा.

  • तुम्ही आंतरराष्ट्रीय UPI पेमेंटसाठी वापरत असलेल्या बँक खात्याच्या पुढील Active बटणावर क्लिक करा.

  • यानंतर तुमचा UPI पिन टाका.


Google Pay कसा अॅक्टिव्ह कराल?



  • सर्वात आधी Google Pay ॲप ओपन करा आणि स्कॅन QR कोड वर टॅप करा.

  • आता कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्याचा QR कोड स्कॅन करा.

  • यानंतर तुमच्या आवडीनुसार रक्कम टाका.

  • आता तुम्हाला पेमेंट करायचे असलेले बँक अकाऊंट ओपन करा.

  • त्यानंतर 'UPI इंटरनॅशनल' अॅक्टिव्ह करण्यासाठी एक स्क्रीन दिसेल.

  • येथे UPI इंटरनॅशनल अॅक्टिव्ह करा वर टॅप करा.


'या' देशांमध्ये सुविधा उपलब्ध होणार 


तुम्हाला UPI वापरायचे असलेल्या देशांच्या यादीमध्ये श्रीलंका, मॉरिशस, भूतान, ओमान, नेपाळ, फ्रान्स आणि UAE यांचा समावेश आहे.
NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (NIPL), नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची आंतरराष्ट्रीय ब्रांच, इतर देशांशी करार करून 10 दक्षिण पूर्व आशिया देशांमध्ये QR-आधारित UPI पेमेंट सक्षम केले आहे.


यामध्ये मलेशिया, थायलंड, फिलीपिन्स, व्हिएतनाम, सिंगापूर, कंबोडिया, दक्षिण कोरिया, जपान, तैवान आणि हाँगकाँगचा समावेश आहे. भारत युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, युरोपियन देश आणि यूएस मध्ये UPI सेवा समर्थन आणण्यासाठी देखील काम करत आहे. याचा अर्थ असा की तुम्ही यापैकी कोणत्याही देशात भारतीय रुपयाचे स्थानिक चलनात रूपांतर न करणे निवडू शकता आणि UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी तुमच्या फोनचे ॲप वापरू शकता. आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी तुम्ही फक्त त्या बँकांचा वापर करू शकता ज्या UPI इंटरनॅशनलला सपोर्ट करतात.


महत्त्वाच्या बातम्या :


Reliance Jio Prepaid plans : Jio च्या या प्रीपेड प्लॅन्सवर मिळतेय बंपर ऑफर, 6GB एक्स्ट्रा डेटा ते मिळतील 'हे' फायदे