Reliance Jio Prepaid plans : तुम्ही जर जिओचे (Jio) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स जिओच्या प्रीपेड प्लॅनवर (Reliance Jio Prepaid plans) बंपर ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना 6GB अतिरिक्त डेटा सोबत फायदा मिळतो. या प्लॅनमध्ये, 399 रूपये आणि 219 रूपयांच्या प्रीपेड प्लॅन्सचा समावेश आहे. या फायद्यां व्यतिरिक्त जिओ टीव्ही (Jio TV) आणि जिओ सिनेमाचे (Jio Cinema) सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे. हा प्लॅन नेमका काय आहे याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 


जिओ 399 रुपयांचा प्लॅन (Jio 399 Rs. Prepaid plan)


या प्लॅनमध्ये, ग्राहकांना 28 दिवसांसाठी 6 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. याच्यामध्ये दररोज 3 GB डेटा वापरून 90 GB पूर्ण डेटा उपलब्ध आहे. जर ग्राहक 61 रुपये खर्च करतात, तर त्यांना 6 GB अतिरिक्त डेटा मिळतो आणि प्लॅनची वैधता सुरू राहते. या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud सबस्क्रिप्शन विशेषतः उपलब्ध आहेत.


जिओ 219 रुपयांचा प्लॅन (Jio 219 Rs. Prepaid plan)


या प्लॅनमध्ये, ग्राहकांना 14 दिवसांसाठी 3 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. त्याचबरोबर, दररोज 3 जीबी डेटा आणि अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत. जिओने ऑफर केलेल्या या प्लॅनद्वारे ज्या ग्राहकांना 2 GB अतिरिक्त डेटाचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी त्यांना 25 रूपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये आणि त्यांच्या सुविधांमध्ये जिओ TV, Jio Cinema आणि Jio Cloud सबस्क्रिप्शन समाविष्ट आहेत.


जिओने या ऑफरद्वारे ग्राहकांना अधिक डेटा आणि सुविधांसह विशेष फायदे दिले आहेत, ज्यामुळे ग्राहक अधिक सुविधा सहज प्राप्त करू शकतात. आपल्याला जिओच्या या प्रीपेड प्लॅन्सबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, आपण जिओच्या आधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकता.


तरी, जे ग्राहक जिओ सिमकार्ड वापरत असतील त्यांनी लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्यावा असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


OnePlus Smartphone : OnePlus चा हा स्मार्टफोन भारतात या दिवशी होणार लॉन्च; कॅमेरा फिचर्ससह 'या' गोष्टी आहेत खास