Smartphone Display Brightness : सध्याच्या काळात स्मार्टफोनचा (Smartphone) वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. स्मार्टफोनमुळे अनेक गोष्टी अगदी सहज सोप्या झाल्या. मोबाईलच्या एका क्लिकवर आपण एखाद्याला पैसे पाठवू शकतो, नवीन माहिती मिळवू शकतो, संवाद साधू शकतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास कसा करायचा यांसारख्या अनेक गोष्टी स्मार्टफोनमुळे सहज शक्य झाल्या. या सगळ्या स्मार्टफोनच्या अगदी सकारात्मक गोष्टी जरी असल्या तरी स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे विशेष म्हणजे त्याच्या ब्राईटनेसमुळे (Brightness) तुमच्या डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो. फार कमी लोकांना माहित आहे की, स्मार्टफोनच्या ब्राईटनेसचा तुमच्या डोळ्यांबरोबरच तुमच्या मेंदूवरही वाईट परिणाम होतो. अशातच स्मार्टफोनचा वापर करुन देखील डोळे कसे निरोगी राखता येतील या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


तुम्ही घरात असल्यास, तुमच्या Android किंवा iOS मोबाईलचा स्क्रीन ब्राईटनेस 30% वर सेट करा. पण, जर तुम्ही बाहेर असाल किंवा उन्हात असाल तर तुम्ही 50 टक्क्यापर्यंत ब्राईटनेस वाढवू शकता. हे तुमच्या डोळ्यांसाठी सर्वात बेस्ट आहे. तुम्ही अडॅप्टिव्ह स्क्रीन ब्राईटनेस (Adaptive Screen Brightness Mode) वापरल्यास तुम्हाला त्याचा उपयोग होईल. यामुळे स्मार्टफोनचा ब्राईटनेस प्रकाशानुसार कमी-जास्त होतो. 


जास्त ब्राईटनेसचा मेंदूवरही होतो परिणाम


अनेक संशोधनानुसार असं दिसून आलं आहे की, काही लोकांनी ब्राईटनेस मीडियम किंवा त्याहून जास्त मोडवर ठेवला आणि त्यानंतर स्मार्टफोन बराच वेळ वापरला तर यामुळे त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला. यामुळे अनेकांना हलकीशी चक्कर येण्याचीही तक्रार आली. 


स्मार्टफोनपासून डोळ्यांची 'अशी' काळजी घ्या 



  • असे अनेक पर्याय आहेत, ज्याचा वापर करुन तुम्ही तुमचे डोळे मोबाईलपासून सुरक्षित ठेवू शकता. तुम्ही मोबाईलमध्ये नाईट मोड ऑन करु शकता. ब्लू फिल्टरचा वापर करु शकता. किंवा मग स्मार्टफोन ब्राईटनेस सेटिंग कमी-जास्त करु शकता.   

  • नाईट मोडमध्ये, स्मार्टफोनचा ब्राईटनेस योग्य पातळीवर सेट केला जातो, ज्यामुळे डोळ्यांवर फारसा परिणाम होत नाही.

  • ब्लू लाईट फिल्टर डोळ्यांसाठी चांगला आहे. हे सूर्याच्या अतिनील किरणांपासून डोळ्यांचं संरक्षण करण्यास मदत करतात.

  • ब्लू लाईट फिल्टर आता सर्वच स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. पण, जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे फिचर नसेल, तर तुम्ही प्ले स्टोअरवरुन हे फिचर डाऊनलोड करु शकता.


महत्त्वाच्या बातम्या : 


स्मार्टफोनचा जास्त वापर करताय? वेळीच सावध व्हा; अन्यथा होऊ शकतो Nomophobia