Samsung Galaxy S24 Ultra : कोरियन कंपनी Samsung नवीन वर्षात आपली (Samsung) प्रीमियम स्मार्टफोन सीरीज लाँच करणार आहे. आपण सगळेच या सिरीजची आतुरतेने वाट पाहत होतो आणि सर्वांच्या नजरा विशेषत: अल्ट्रा मॉडेल्सवर होत्या. पण आता वाट बघण्याची वेळ संपलीय.या वर्षी फेब्रुवारीमध्ये कोरियन कंपनी सॅमसंगने Galaxy S23 सीरीज लॉन्च केली होती. या सिरीजमधीलल अल्ट्रा मॉडेल जगभरातील अनेक लोकांना आवडले. यामध्ये कंपनीने 200MP चा कॅमेरा दिला होता. आता सॅमसंग आपली नवीन सीरीज जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात लाँच करू शकते. कंपनी 17 जानेवारी रोजी Galaxy S24 ची सिरीज जागतिक स्तरावर लाँच करू शकते. यामध्ये 3 फोन लाँच केले जातील ज्यात Galaxy S24, S24 Plus आणि S24 Ultra यांचा समावेश आहे. यावेळी देखील कंपनी अल्ट्रा मॉडेलमध्ये 200 एमपी कॅमेरा देणार आहे परंतु त्यात काही बदल केले जातील.
किती असेल किंमत?
लीक्समध्ये असे म्हटलं जात आहे की, कंपनी नवीन सीरीज ही मागील सीरीजच्या प्राइज रेंजनुसार लाँच करू शकते. S23 ची सुरुवात 74,999 रुपये अशी झाली होती. foneaerna च्या रिपोर्टनुसार, कंपनी पूर्वीच्या सीरीजपेक्षा कमी किंंमतीत नवीन सीरीज युरोपमध्ये लाँच करू शकते. आम्ही खाली वेबसाइटची किंमत तुमच्यासोबत शेअर करत आहोत. या
Samsung Galaxy S24 8GB + 128GB – 899 युरो ( रु 82,940)
Samsung Galaxy S24 8GB + 256GB – 959 युरो ( रु 88,465)
Samsung Galaxy S24+ 12GB + 256GB – 1,149 युरो (रु 1,06,015)
Samsung Galaxy S24+ 12GB + 512GB – 1,269 युरो (रु. 1,17,090)
Samsung Galaxy S24 Ultra 12GB + 256GB – 1,449 युरो (1,33,695)
Samsung Galaxy S24 Ultra 12GB + 512GB – 1,569 युरो (1,44,800)
Samsung Galaxy S24 Ultra 12GB + 1TB – 1,809 युरो (रु 1,66,950)
Galaxy S24 अल्ट्रा स्पेक्स काय आहे?
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 120Hz च्या रिफ्रेश रेट आणि 6.8 इंचाचा QHD Plus डिस्प्ले मिळू शकतो. हा मोबाईल फोन क्वालकॉमच्या नवीन चिपसेटवर काम करेल. स्मार्टफोनला 2600 nits ची पीक ब्राइटनेस मिळू शकते. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये 200MP वाइड लेन्स, 50MP 5x टेलिफोटो लेन्स, 10MP 3x टेलीफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रावाइड लेन्स असतील. कंपनी फ्रंट कॅमेरआसाठी 12MP कॅमेरा देऊ शकते. हे अल्ट्रा मॉडेल कंपनी 4 कलर ऑप्शन मध्ये लाँच करू शकते ज्यात टायटॅनियम ग्रे, ब्लॅक, व्हायलेट आणि यलो यांचा समावेश आहे. Galaxy S24 Ultra मध्ये 45 वॉट वायर्ड चार्जिंग, 15 वॉट वायरलेस चार्जिंग आणि 4.5 वॉट रिव्हर्स चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी मिळू शकते.
इतर महत्वाची बातमी-