Xamalicious Malware : सायबर क्राईमचं प्रमाण वाढत आहे. त्यातच (Xamalicious Malware) सिक्युरिटी रिसर्चर्स (Security Research) रोज नवनव्या गोष्टींवर आणि मालवेअर्सवर काम करत असतात. त्यांचा शोध घेत असतात. मॅकेफी संशोधकांनी अँड्रॉइड युजर्ससाठी एक इशारा जारी केला आहे. खरं तर संशोधकांना असे काही अँड्रॉइड अ‍ॅप्स सापडले आहेत. ज्यात 'Xamalicious' नावाचा मालवेअर सापडला आहे, ज्याचा 3 लाखांहून अधिक डिव्हाइसवर परिणाम झाला आहे. गुगल प्लेस्टोअरवरील (Google Playstore) 14 अॅप्समध्ये (mobile Apps) हा धोकादायक मालवेअर सापडला आहे, जो लोकांच्या डिव्हाइसमध्ये अॅक्सेस (Device Access) मिळवून डेटा चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे.


1 लाखांहून अधिक लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले 


रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,  14 अ‍ॅप्सपैकी 3 अ‍ॅप्स असे आहेत की 1 लाखाहून अधिक लोकांनी ते डाऊनलोड केले आहेत. या मालवेअरमुळे अनेकांचा डेटा लीक झाला आहे आणि अनेकांची प्रायव्हेट माहितीदेखील लीक झाल्याची माहिती आहे. मात्र यातच गुगलने या सगळ्या अप्सवर कारवाई केली आहे. त्यांनी प्ले स्टोअरवरुन या सर्व अॅप्स हटवल्या आहेत. 


हे अॅप्स डिलीट करा!


- Essential Horoscope for Android (1 लाखपेक्षा जास्त लोकांनी इनस्टॉल केलं आहे)
- 3D Skin Editor for PE Minecraft (1 लाखपेक्षा जास्त लोकांनी इनस्टॉल केलं आहे)
- Logo Maker Pro (1 लाखपेक्षा जास्त लोकांनी इनस्टॉल केलं आहे)
- Auto Click Repeater (10,000 पेक्षा जास्त लोकांनी इनस्टॉल केलं आहे)
- Count Easy Calorie Calculator (10,000 पेक्षा जास्त लोकांनी इनस्टॉल केलं आहे)
- Dots: One Line Connector (10,000 लोकांनी इनस्टॉल केलं आहे )
- Sound Volume Extender (5,000 लोकांनी इनस्टॉल केलं आहे ) 
-या व्यतिरिक्त 12 अॅप्स आहेत. ज्यावर  'Xamalicious' या मालवेअरने अटॅक केला आहे. APK फॉर्ममध्ये येणाऱ्या अॅप्सला या मालवेअरचा जास्त प्रमाणात धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


Private data : तुमचा प्रायव्हेट डेटा धोक्यात 


Xamalicious एक अँड्रॉइड बॅकडोअर आहे जो नेट फ्रेमवर्कवर आधारित आणि ओपन-सोर्स झॅमेरिन फ्रेमवर्क वापरुन तयार केलेल्या अ‍ॅप्समध्ये टाकण्यात येतो. अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर हा मालवेअर अ‍ॅक्सेसिबिलिटी सर्व्हिसमध्ये प्रवेश मिळवतो आणि नंतर स्क्रीनवर गोष्टी रेकॉर्ड करतो आणि बॅकग्राऊंडमधील अ‍ॅप्समधून डेटा चोरतो. हा डेटा चोरुन विविध लोकांची फसणूक केली जात आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Chameleon Malware : ना फिंगरप्रिंट, ना फेस लॉक; या मालवेअरसमोर सगळं फेल; Android Users ला सर्वाधिक धोका!