Spam Calls : ऑफिसमध्ये बसून तुम्ही कोणते महत्त्वाचे काम करत (Spam Calls) असाल किंवा मग घरी राहुन फॅमिली सोबत मस्त चर्चा करत असाल आणि तेवढ्यात अनोळख्या नंबर वरून येणारे कॉल आणि मॅसेज यामुळे तुमचं लक्ष भरकटते. तुमच्या सोबत सुद्धा असचं होत का? तुम्ही सुद्धा Spam calls आणि Spam message यापासून कंटाळला आहात? अनेक वेळा अशा कॉल आणि मेसेजच्या मदतीने लोकांची फसवणूक केली जाते.
तुम्हालाही अशा स्पॅम मेसेजमुळे त्रास होत असेल तर तुम्ही त्यांना आपोआप त्याला ब्लॉक करू शकता. Google ने हे खास फिचर अँड्रॉइड यूजर्सना दिले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही स्पॅम मेसेज टाळू शकता.यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाही, तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
या स्टेप्स नक्की वापरा!
-सगळ्यात अगोदर तुम्हाला Google Messages ॲप उघडावे लागेल.
-येथे उजव्या कोपऱ्यात असलेल्या तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करावे लागेल.
-यानंतर आता तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला स्पॅम प्रोटेक्शन्सचा पर्याय मिळेल.
-तुम्हाला हे फिचर चालू करावे लागेल. यानंतर तुमच्या फोनवर येणारे स्पॅम मेसेज आपोआप ब्लॉक होतील.
-मात्र, तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
- जर कोणी मेसेज पाठवणाऱ्याला स्पॅम म्हणून अगोदर मार्क केलेले असेल तरच हे फिचर काम करेल.
-तुमची इच्छा असल्यास तुम्हीसुद्धा मेसेज पाठवणार्याला स्पॅम म्हणून मार्क करू शकता.
गुगलने फक्त मेसेजिंगसाठीच नाही तर कॉलिंगसाठी देखील एक फिचर सुरू केले आहे. तुम्ही ते अगदी सहज वापरू शकता. यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. इथे तुम्हाला स्पॅम आइडेंटिफिकेशन हे ऑप्शन मिळेल. ते चालू करावे लागेल आणि फिल्टर स्पॅम कॉलचे टॉगल सुरू करावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही स्पॅम मॅसेज आणि कॉल यापासून तुमची सुटका होईल. सध्या सगळीकडेच स्पॅम कॉलचा धुमाकूळ आहे. त्यामुळे हे कॉल्स थांबवण्यासाठी लोक नवनव्या शक्कल लढवत असतात. त्यांच्यासाठी आता गुगलनेच पर्याय दिले आहेत. हे पर्याय वापरुन तुम्ही हे सगळे स्पॅम कॉल्स थांबवू शकता आणि अशा कॉल्सला ब्लॉकदेखील करु शकता.
इतर महत्वाची बातमी-