Best 5G Phones Under 20,000 : आजकाल 5G ची क्रेझ लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे. तसेच आपल्यापैकी बरेच जण 5G फोन वापरण्यावर भर देत आहेत. मात्र बाजारात सध्या असे काही स्मार्टफोन आहेत जे सामान्य लोकांना परवडणारे आहेत. म्हणजेच हे फोन केवळ 20,000 रूपयांमध्ये उपलब्ध आहेत. जाणून घेऊया या सर्वात कमी किंमतीतल्या काही चांगल्या स्मार्टफोनद्दल. 


Realme 10 Pro 5G


Realme 10 Pro स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन ट्विन लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा डिझाइनमध्ये येतो. यात 108 MP मुख्य कॅमेरा आणि दुसरा 2 MP कॅमेरा आहे. तर समोर 16 MP कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्याला 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे आणि या फोनची किंमत फक्त 18,999 रुपये आहे. 


Poco M4 5G


POCO M4 स्मार्टफोन 90Hz डायनॅमिक रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये Octacore Mediatek Dimensity 700 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.5 इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. तर किंमत 16,999 रुपये आहे.


OnePlus Nord CE 2 Lite 5G


OnePlus Nord CE 2 Lite 5G मध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच 120 Hz डिस्प्ले आणि 64 MP AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनची किंमत 18,999 रुपये आहे. 


Redmi Note 11 Pro 5G


फोटोग्राफीसाठी, यात 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ कॅमेरासह 108MP प्रो ग्रेड कॅमेरा आहे. तसेच, सेल्फीसाठी यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, यात 5,000mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे हा फोन 15 मिनिटांत 51% आणि 42 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतो. फोनची किंमत 18,999 रुपये आहे.


Poco X4 Pro 5G


या फोनचा डिस्प्ले 6.67-इंच, 1080x2400 पिक्सेल आहे तर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 देण्यात आला आहे. रॅम 8 GB , स्टोरेज 128GB, बॅटरी 5000mAh , बॅक तसेच फ्रंट कॅमेरा 64MP + 8MP + 2MP आणि 16MP देण्यात आला आहे. फोनची किंमत 17,990 आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Twitter ID Verification : ट्विटरच्या व्हेरिफिकेशन प्रक्रियेत होणार मोठा बदल, सरकारी डॉक्युमेंट दाखवून मिळणार ब्लू टिक