Realme Narzo 60 Series : भारतात पुढील महिन्यात स्मार्टफोन निर्माता कंपनी रियल मी (Realme) एका नवीन सीरिजचा फोन लाँच करणार आहे. हा रियलमी नारजो 60 सीरिजचा (Realme Narzo 60) स्मार्टफोन आहे. रियलमीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरद्वारे नवीन सीरिजच्या स्मार्टफोनबद्दल हिंट दिली आहे. कंपनी 22 जून  आणि 26 जूनला नवीन सीरिजशी संबंधित घोषणा करू शकते. कंपनी रियल मी नारजो 60 या फोनशिवाय आणखीन एक फोन लाँच करू शकते. मात्र, याची आजून कोणतीही माहिती समोर आली नाही. ही नवीन सीरिज Narzo 50  सीरिजच्या पुढील व्हर्जन आहे. Narzo 50 ही सीरिज प्रचंड यशस्वी ठरली होती. यानिमित्त कंपनीने नवीन सीरिजचा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.


तब्बल 2 लाख 50 हजार फोटो करता येणार स्टोर 


कंपनीने आपल्या अधिकृत वेबासाईटवर सांगितल्यानुसार, या नवीन स्मार्टफोनमध्ये तब्बल 2 लाख 50 हजार फोटो स्टोर करता येणार आहेत. याचा अर्थ, 1TB पर्यंत स्टोरेज क्षमतेची सुविधा मिळणार आहे. यामध्ये एसडी कार्डचा सपोर्टही मिळणार आहे. यामुळे तुम्हाला फोटोची आवड असेल, तर Narzo 60 सीरिज बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.   


या स्मार्टफोनमध्ये ही आहेत स्पेसिफिकेशन्स 


अलिकडेच गीकबेंच (Geekbench) वेबसाईटवर एक स्मार्टफोन स्पॉट करण्यात आला होता. कदाचित, तो Realme Narzo 60 Series चा स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर, 6GB  रॅम आणि रियल मी  UI 4.0  चा सपोर्ट मिळू शकतो. एका वृत्तानुसार,  Realme 60 स्मार्टफोन Realme 11 5G  चा रिब्रँडेड व्हर्जन असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ, या नवीन फोनमध्ये तेच स्पेसिफिकेशन्स मिळतील जे Realme 11 5G मध्ये उपलब्ध आहेत. जर असं असेल, तर फोनमध्ये 6.43 इंची एमोलेड डिस्प्ले आणि 90hzच्या रिफ्रेश रेटसह उपलब्ध करून दिला आहे. यासोबत 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि  फ्रंट कॅमेऱ्यात  8 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. 


हा पातळ फोल्डेबल फोन लवकरच होईल लाँच 


मोटोरोला भारतात Motorola Razr 40 सीरिजला लाँच करू शकते. या सीरिजमधील दोन स्मार्टफोन कंपनी लाँच करणार आहे. यामध्ये  Motorola Razr 40  आणि 40 अल्ट्रा हे स्मार्टफोनचा समावेश आहे. परंतु, याबाबत कंपनीने अधिकृतपणे काहीच माहिती दिली नाही. यासोबत काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं म्हणणे  आहे की, कंपनी पुढील महिन्यात त्यांचा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नवीन सीरिजमधील कंपनी जगातील सर्वात मोठा कव्हर डिस्प्ले आणि पातळ फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करू शकते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा :


फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 64MP कॅमेऱ्यासह Realme Narzo N55 चा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च; किंमत 15000 पेक्षाही कमी