Power Bank : आजच्या काळात मोबाईल अत्यंत गरजेची गोष्ट झाली आहे. मोबाईलवर सध्या प्रत्येक काम केले जाते. म्हणून मोबाईल महत्वाचे  साधन झाले आहे. पण या मोबाईलसोबतच पाॅवर बँकला देखील तितकेच महत्व आहे.  मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवर बँक हे एक आवश्यक घटक बनला आहे. कामाच्या निमित्त्ताने अनेक लोक बाहेर जात असतात. अशा वेळी घाई गडबडीत फोन चार्ज करायला वेळ मिळत नाही. या परिस्थितीत पाॅवर बँक मोठ्या प्रमाणात कामी पडू शकते. जर तुम्ही पाॅवर बँक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. जाणून घेऊयात सविस्तर.


-  कोणतीही पाॅवर बँक खरेदी करताना त्या पाॅवर बँकची नेमकी क्षमता किती आहे हे पाहणे फार महत्वाचे आहे. जर तुमच्या फोनची बॅटरी 5000mAh आहे. तर तुम्ही 10000 mAh ची पाॅवर बँक खरेदी करणं गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही दोन वेळा तुमची पाॅवर बँक चार्ज करू शकाल. सध्या बाजारात 15,000 mAh पर्यंतच्या बॅटरी असलेल्या पॉवर बँक स्वस्त दरात उपलब्ध आहेत. 


-  तसेच तुम्ही खरेदी करत असलेली पाॅवर बँक एका वेळेस किती डिव्हाईस चार्ज करू शकते याची देखील माहिती घेणे गरजेचे आहे. विकत घेत असलेली पाॅवर बँक अशी हवी जी एकाच वेळी कमीत कमी दोन फोन चार्ज करेल. 


-  पॉवर व्होल्टेज खूप महत्वाचे आहे. तुम्ही खरेदी केलेल्या पॉवर बँकचा आउटपुट व्होल्टेज तुमच्या फोनच्या बरोबर नसेल तर फोन चार्ज होऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत, तुम्हाला फोन प्रमाणेच आउटपुट व्होल्टेज असलेली पॉवर बँक खरेदी करावी लागेल. बाजारात वेगवेगळ्या व्होल्टेज क्षमतेच्या पॉवर बँक उपलब्ध आहेत, ज्यामधून तुम्ही तुमच्या गरजेनुसार पॉवर बँक निवडू शकता.


- चांगल्या दर्जाची चार्जिंग केबल तुमच्या डिव्हाइसला लवकर चार्ज करण्यास मदत करते तसेच ती अधिक टिकाऊ देखील असते आणि चांगल्या दर्जाच्या केबलमुळे तुमच्या डिव्हाइसला कोणतेही नुकसान होत नाही. तसेच डिव्हाईस जास्त गरम होण्यापासून वाचू शकते. त्यामुळे, शेवटी तुम्ही जी पॉवर बँक खरेदी करणार त्याची चार्जिंग केबल चांगल्या दर्जाची असेल याची खात्री करा.


इतर महत्वाच्या बातम्या