अंबरनाथ : मोबाईलच्या सापळ्यात नवी पिढी पूर्ण अडकल्याची ओरड नेहमीच होत  आहे. स्मार्टफोनला हात लावला तरी त्यांना राग येतोच. पण अशा काही घटना घडल्या आहेत ज्या मध्ये मुलांना स्मार्टफोन न दिल्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. अशीत एक घटना  अंबरनाथमध्ये (Ambernath News) घडली आहे. मोबाईल न दिल्याने एका तरुणाची रॉड घालून हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच तीन आरोपींना अटक केली आहे .


अंबरनाथ पूर्व भागातील पालेगाव परिसरात एमआयडीसी जवळ एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं. बांधकाम सुरू असताना लालजी सहाय हा तरुण फोनवर बोलत असताना त्या ठिकाणी शंभू मांझी हा तिकडे आला आणि त्याने लालजी यांच्याकडे मोबाईल मागितला. मात्र लालजी यांनी मोबाईल न दिल्याने शंभू याला राग आला आणि त्याने बाजूला असलेल्या लोखंडी रॉडने लालजी यांच्या डोक्यात मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र हत्या झालेल्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न शंभू याला पडला होता.


त्यानंतर शंभू यांनी आपले दोन मित्र मनोदीप जामु, चिल्ला मांझी या दोघांची मदत घेत  पालेगावजवळ  हा मृतदेह पाण्याने भरलेल्या एका डबक्यात फेकून दिला. त्यानंतर हे तिघेजण फरार झाले. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस दाखल झाले.  पोलिसांनी तपासाला वेगाने सुरुवात केली. या प्रकरणात 40 संशयित जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी चौकशी केली असता या प्रकरणात तीन आरोपींची नावं समोर आली.  त्यानंतर पोलिसांनी माहिती मिळतात पोलिसांनी सापळा रचून शंभू मांझी,मनोदीप जामु,चिल्ला मांझी या तिन्ही आरोपींना अंबरनाथ मधून अटक करण्यात आली आहे. तर या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने  या आरोपींना सात दिवसांची पोलीस कठोडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तुकाराम पादिर यांनी दिली आहे.


बारामतीत मोबाईल वापरत गाडी चालवणं दोन शाळकरी मुलांच्या जीवावर बेतलं


मोबाईल वापरत गाडी चालवणं  हे दोन शाळकरी मुलांच्या जीवावर बेतलं आहे. बारामतीमधील चोरमंडलम फायनान्समधे मॅनेजर पदावर असलेला धायगुडे नावाचा व्यक्ती मोबाईल पहात कार  चालवत होता.  मोबाईलच्या नादात त्याने शाळेत चाललेल्या तीन मुलांना उडवलं. त्यात दोन सख्खे भाऊ होते तर एक त्यांचा चुलतभाऊ होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर आहे. त्यामुळे आजच्या युगात मोबाईल वापरणे हे महत्त्वाचे असले तरी कधी मोबाईल वापरावा याची जाण असणं महत्वाचं आहे.  


हे ही वाचा :


Nagpur: मुलीला पाच ते सहा दिवस घरात कोंडून कुटुंबीय बाहेरगावी; शेजाऱ्यांनी खिडकीच्या ग्रीलमधून काढलं बाहेर