Apple Event 2023 : आतापासून अवघ्या काही तासांनंतर, iPhone 15 सीरीज लॉंच होईल. ॲपलचा 'वंडरलस्ट इव्हेंट' आज रात्री 10:30 वाजता सुरू होईल. या दरम्यान कंपनी लोकांना iPhone 15 सीरीज, स्मार्टवॉच सीरीज 9, वॉच अल्ट्रा 2 आणि नवीन OS वर अपडेट्स देईल. यावेळी Airpods Pro यूएसबी टाइप-सी चार्जिंगसह लॉंच करण्याची शक्यता आहे. तुम्ही Apple चे YouTube चॅनल, Apple TV आणि अधिकृत वेबसाइट द्वारे लॉन्च इव्हेंट पाहू शकाल. लॉंच होण्यापूर्वी आम्ही तुम्हाला Apple च्या iPhone 15 सीरीजची किंमत सांगणार आहोत.
भारतात असू शकते ही किंमत
Apple ची iPhone 15 सीरीज भारतात 80,000 रुपयांपासून सुरू होऊ शकते. त्याच वेळी, iPhone 15 Plus ची किंमत 89,900 रुपये असू शकते. याबाबत असंही सांगण्यात येतंय की, प्रो मॉडेलची किंमत 100 डॉलर्स जास्त असू शकते आणि प्रो मॅक्सची किंमत 200 डॉलर जास्त असू शकते. तर किंमत वाढण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात येत आहे कारण कंपनीने नवीन मॉडेल्सच्या प्रो व्हेरियंटमध्ये कॅमेरा, पेरिस्कोप लेन्स, झूम क्षमता, जलद चार्जिंग, मोठी बॅटरी इत्यादी काही अपडेट्स दिले आहेत. दरम्यान, कंपनीने गेल्या वर्षी यूएसमध्ये लॉन्च केलेला iPhone 14 चा प्रो व्हेरिएंट $999 आणि Pro Max $1,099 मध्ये लॉन्च केला होता. जर ही माहिती खरी असेल तर कंपनी प्रो मॅक्स व्हेरिएंट भारतात 1,59,900 रुपयांमध्ये लॉन्च करू शकते.
स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला iPhone 15 आणि 15 Plus मध्ये 6.1 इंच डिस्प्ले मिळेल. यावेळी तुम्हाला बेस व्हेरिएंटमध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा मिळेल. यात डायनॅमिक आयलॅंड फीचर देखील असेल. याशिवाय, दोन्ही फोनमध्ये 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा असेल. प्रो मॉडेल्सबद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला 6.7 इंचाचा डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी, यात ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये iPhone 15 Plus मध्ये 48MP मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 12MP 3x टेलीफोटो लेन्स असेल. iPhone 15 pro max मध्ये तुम्हाला 3x ऐवजी 6x झूमिंग पेरिस्कोप लेन्स मिळेल.
बॅटरीची क्षमता
कंपनी यावेळी बॅटरीची क्षमता देखील वाढवू शकते. यापूर्वी लीक झालेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर, iPhone 15 मध्ये 3,877 mAh बॅटरी असू शकते, 15 Plus मध्ये 4,912 mAh बॅटरी असू शकते, 15 Pro मध्ये 3,650 mAh बॅटरी असू शकते आणि 15 Pro Max मध्ये 4,852 mAh बॅटरी असू शकते. प्रो मॉडेल्समध्ये अॅपल 35 वॉट फास्ट चार्जिंग देऊ शकते असेही सांगितले जात आहे.
Honor 90 चीही प्रतिक्षा
गॅजेटप्रेमी Honor 90 स्मार्टफोनचीही वाट पाहत आहेत. या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी, 200MP कॅमेरा आणि 6.7 इंच डिस्प्ले असेल. भारतात या फोनची किंमत 35,000 रुपयांपासून सुरू होऊ शकते.
संबंधित बातम्या