Apple कंपनीने नुकतेच आपली आयफोन सिरिज लाँच केली आहे. येत्या 15 सप्टेंबरपासून आयफोनची प्री-ऑर्डर सुरू होणार आहे. नवीन सीरिज लाँच होऊन केवळ 1 दिवस झाला आहे. मात्र आता Apple च्या इतर माॅडेल्सच्या किंमती कमी झाल्या आहेत. यामुळे ज्या लोकांना आयफोन घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही मोठी खूशखबर आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साइट्सवर या फोनच्या किमतीत थोडा फरक असू शकतो. आयफोनच्या जुन्या मॉडेल्सची नवीन किंमत जाणून घेऊया.


हे माॅडेल्स झाले बंद


Apple ने iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max आणि मागील इतर जुने माॅडेल्य नॉन-प्रो/प्रो मॉडेल्स बंद केले आहेत. 


माॅडेलची जुनी किंमत आणि नवीन किंमत


Iphone 14 - 79,900 मूळ किंमत - 69,900 नवीन किंमत  (128 GB)


Iphone 14 - 89,900 मूळ किंमत - 79,900 नवीन किंमत (256 GB)


Iphone 14 - 1,09,900 मूळ किंमत - 99,900 नवीन किंमत ( 512 GB)


Iphone 14 PLUS - 99,900  मूळ किंमत - 89,900 नवीन किंमत (128 GB)


Iphone 14 PLUS - 89,900 मूळ किंमत - 79,900 नवीन किंमत (256 GB)


Iphone 13 - 69,900 मूळ किंमत - 59,900 नवीन किंमत (128 GB)


Iphone 13 - 79,900 मूळ किंमत - 69,900 नवीन किंमत (256 GB)


Iphone 13 - 99,900 मूळ किंमत - 89,900 नवीन किंमत  (512 GB)


iPhone 15 मालिकेची किंमत


भारतात iPhone 15 Pro Max च्या 1TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,99,900 रुपये असेल, जी 2 लाख रुपयांपेक्षा फक्त 100 रुपये कमी आहे. तर भारतात iPhone 15 Pro आणि iPhone Pro Max ची सुरुवातीची किंमत 1,59,900 रुपये असेल आणि ती 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेजमध्ये उपलब्ध असेल. Apple ने आपली iPhone 15 सीरीज जागतिक बाजारात लॉंच केली आहे. कंपनीने आपल्या लॉंच इव्हेंटमध्ये 4 नवीन iPhones iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max लॉंच केले आहेत.  iPhone 15 भारतातील 2 लाख रुपयांच्या किंमतीवरून केवळ 100 रुपयांनी स्वस्त झाला आहे. 


iPhone 15 सीरीजचा कॅमेरा


iPhone 15 Pro आणि Pro Max च्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्या मागील पॅनलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 48MP मुख्य पोर्ट्रेट कॅमेरा उपलब्ध असेल, जो रात्रीच्या मोडमध्ये उत्कृष्ट फोटो क्लिक करतो. एक नवीन 24MP फोटोनिक कॅमेरा उपलब्ध असेल, जो कस्टमाईझ्ड कॅमेरा अनुभव देईल. तसेच, तिसऱ्या कॅमेरामध्ये 5X ऑप्टिकल झूमसह 12MP टेलिफोटो कॅमेरा असेल.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Google Internship 2024 : गुगलमध्ये इंटर्नशीप करण्याची संधी, 80 हजार पगार; अर्ज कसा आणि कुठे कराल? जाणून घ्या...