Police Varification Mandatory For SIM Card : आजकाल सायबर गुन्ह्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक सामान्य लोक याचे बळी ठरत आहेत आणि यामुळेच लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील होते. याच वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याकरता केंद्र सरकारने आता मोठे पाऊल उचलले आहे. जे दुकानदार सिम कार्ड विक्री करतात त्यांना आता पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य केले आहे. याबरोबरच मोठ्या प्रमाणात सिमकार्ड कनेक्शन देण्याच्या तरतुदीवरही बंदी घालण्यात आली आहे. रेल्वे आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. सोबतच या सिम कार्ड विक्रेत्यांची पडताळणी ही टेलिकॉम ऑपरेटरद्वारे केली जाईल.


सिम कार्ड डीलर्सचे व्हेरिफिकेशन टेलिकॉम कंपन्यांकडून केले जात आहे. डीलरची नियुक्ती करण्यापूर्वी ते प्रत्येक अर्जदाराचे तपशील आणि त्याच्या व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे पडताळणीसाठी गोळा करणार आहे. देशात 10 लाख सिम कार्ड डीलर आहेत आणि त्यांना त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाणार आहे. म्हणजेच सध्या दुकानदारांकडे नोंदणीसाठी 12 महिन्यांचा कालावधी आहे एखादा डीलर चुकीच्या कामात गुंतलेला आढळल्यास सरकार त्याचा परवाना 3 वर्षांसाठी रद्द केले जाणार आहे आणि त्यानंतर सरकार बेकायदेशीरपणे काम करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करेल.


अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सरकारने 52 लाख मोबाईल कनेक्शन बंद केले आहेत. तर 67,000 सिम कार्ड डीलर्सना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. मे 2023 पासून सिम कार्ड डीलर्सविरुद्ध 300 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. WhatsApp ने त्यांच्या वतीने 66,000 खाती ब्लॉक केली आहेत, जी फसवणूक करीत आहेत. तर फसवणूक करणाऱ्यांनी वापरलेली सुमारे 8 लाख बँक खाती बंद करण्यात आली आहेत. सिम कार्ड विक्रेत्यांसाठी पोलीस पडताळणी अनिवार्य करण्यात आली असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच संचार साथी पोर्टल लाँच केले आहे ज्याच्या मदतीने लोकांना कळू शकते की, त्यांच्या नावाने किती सिम कार्ड रजिस्टर आहेत. याच्या मदतीने तुम्ही सिम कार्ड ब्लॉक करु शकता, मोबाईल चोरी झाल्यास त्याची तक्रार नोंदवू शकता आणि खोटा क्रमांक ब्लॉक करु शकता. आतापर्यंत संचार साथी पोर्टलच्या साहाय्याने सुमारे 114 कोटी अॅक्टिव मोबाईल कनेक्शन तपासले गेले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


Mobile Phone :  मोबाईल फोनच्या कव्हरमध्ये 50,100 रुपयांची नोट ठेवता? मग ही बातमी वाचा...