Mobile Phone :  भारतात अनेकांच्या मोबाईल फोनच्या कव्हरमध्ये 10, 50 रुपयांपासून ते 500 रुपयांची नोट ठेवलेली दिसून येते. फोनच्या कव्हरमध्ये ठेवलेले हे पैसे ऐनवेळी, आणीबाणीच्या प्रसंगी मदतीला येतील असे  अनेकांना वाटत असते. मात्र, अशा प्रकारे नोटा ठेवणे हे धोकादायक ठरू शकते ही बाब अनेकांना लक्षात येत नाही. एका चुकीमुळे एखाद्याला प्राणासही मुकावे लागू शकते. 


फोन गरम झाल्यानंतर...


जेव्हा तुम्ही मोबाईल फोनचा अधिक वापर करता, तेव्हा हॅण्डसेट अधिक गरम होतो, ही बाब तुमच्या लक्षात आली असेल. फोन गरम होताच फोनची मागील बाजू जळू लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या फोनच्या कव्हरच्या मागे एक नोट ठेवली असेल, तर फोनमधील उष्णतेचा मार्ग बंद होतो. त्यामुळे तो स्फोट होऊ शकतो. यामुळे मोबाईल फोनमध्ये घट्ट कव्हर वापरू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फोनमधील उष्णता बाहेर न पडल्यास फोनचा स्फोटही होऊ शकतो.


नोटांवरील केमिकलही घातक 


नोटा कागदापासून बनवल्या असल्या तरी त्यात अनेक प्रकारची रसायने वापरली जातात. अशा परिस्थितीत, जेव्हा फोन गरम होतो आणि नोटमुळे उष्णता सोडली जात नाही, तेव्हा त्याला आग लागू शकते. नोटेमध्ये असलेल्या केमिकलमुळे ही आग आणखी वाढू शकते. त्यामुळे मोबाईल फोन कव्हरच्या मागे चुकूनही कोणत्याही प्रकारची नोट ठेवू नका. मोबाईल फोनचे कव्हर अतिशय काळजीपूर्वक लावा. कव्हर जर घट्ट असेल तर फोन ब्लास्ट होऊ शकतो. 


त्याशिवाय नेहमी लक्षात ठेवा की जर नोट फोनच्या कव्हरमध्ये ठेवली असेल तर फोन चार्जिंगला असताना वापरू नका. कधीकधी नेटवर्कची समस्या जाणवू शकते. मोबाईल फोन चार्जिंगला असताना त्याचा वापर करणे, मोबाईल फोनवर बोलणे हे धोकादायक ठरू शकते. 


मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीरावर दुष्परिणाम 


मोबाईल फोनचा अतिवापर वाढला आहे. पण यासोबतच याचे दुष्परिणाम देखील तितकेच वाढले आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदुखी, टेन्शन, निद्रानाश आणि कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो. मुलं अभ्यास करताना सुद्धा मोबाईलवर गेम खेळत असतात आणि इंटरनेट वापरतात. त्याचा परिणाम एकाग्रतेवर आणि अभ्यास करताना होतो. त्याशिवाय, मोबाईलचा वापर करताना electromagnetic रेडिएशन निघतात, त्याचा परिणाम शरीरावर होत असल्याचे म्हटले जाते. 


इतर महत्त्वाची बातमी :