Paytm Payment Bank : Indian Highways Management Company (IHMCL) भारतातील टोलशी संबंधित बाबींवर लक्ष ठेवते. सामान्यत: पेटीएम (Fastag) पेमेंटबँकेच्या मदतीने युजर्सला फास्टॅग मिळत असे. पण आता पेटीएमला हे देण्यास बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच आता पेटीएम युजर्ससाठी नवीन Fastag जारी करू शकणार नाही.NHAIच्या वतीने टोलशी संबंधित सर्व बाबींमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार IHMCLला देण्यात आले आहेत.


काय आहे कारण?


पेटीएम पेमेंट्स बँकेने सर्व्हिस लेव्हल अॅग्रीमेंटसाठी (एसएलए) घालून दिलेले निकष आणि नियम पाळले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता अशा परिस्थितीत पेटीएम कोणत्याही नवीन टोलसाठी नवीन फास्टॅग जारी करू शकणार नाही. पेटीएम पेमेंट बँकेकडून एनएच नेटवर्क अंतर्गत कोणत्याही टोल प्लाझावर फास्टॅग जारी केला जाऊ शकत नाही. IHMCLच्या वतीने पेटीएमला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. फास्टॅगसंदर्भात अशी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी फास्टॅग केवायसीसंदर्भात सरकारकडून निर्णय घेण्यात आला होता.


31 जानेवारीपासून या कारवाईला सुरुवात


प्रत्यक्षात एक वाहन, एक फास्टॅग सरकारकडून सातत्याने काम केले जात आहे. भारतात लागू करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंट सिस्टीममध्ये ट्रान्स्फरंसी आणण्याच्या उद्देशाने सरकारने ही कारवाई केली. यापूर्वी अनेक फास्टॅग जारी करण्यात आले होते. पण आता सरकार आधी जारी करण्यात आलेले असे सर्व फास्टॅग बंद करणार आहे. 31 जानेवारीपासून या कारवाईला सुरुवात होणार आहे. 


KYC न केल्यास फास्टॅग होईल बंद


भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक अपडेट जारी केला आहे. 31 जानेवारीनंतर केवायसी (KYC - Know your Customer) ने केलेले किंवा अपूर्ण केवायसी झालेले फास्टॅग बंद करण्यात येतील. NHAI कडून जारी करण्यात आलेल्या नव्या अपडेटनुसार, 31 जानेवारी पूर्वी फास्टॅगचे केवायसी (KYC) करणे आवश्यक आहे, अशी घोषणा NHAI ने केली आहे. केवायसी (KYC) न केल्यास 31 जानेवारीनंतर तुमचा फास्टॅग बंद होईल. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना तुम्हाला टोल भरण्यात अडचण येईल आणि प्रवास करतानाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे 31 जानेवारी पूर्वी फास्टॅग केवायसी करून घ्या.


इतर महत्वाची बातमी-


Instagram New Update : Instagram युजर्ससाठी खास अपडेट; आता खास लोकांसाठी बनवू शकता आणखी एक प्रोफाईल, कसं आहे नवं फिचर?


Petrol in Diesel Car : पेट्रोल गाडीत डिझेल अन् डिझेल गाडीत पेट्रोल भरलं तर...; 'गो मेकॅनिक' काय सांगतात?