Instagram New Feature : इन्स्टाग्रामवर तुम्ही सर्व जण नक्कीच (instagram) अॅक्टिव्ह असाल. रोज अनेक जण तुम्हाला फॉलो करत असतात. त्यात काही फेक फॉलोअर्स असतात तर काही आपल्या ओळखीचे लोक फॉलोअर्स असतात. सोशल मीडियाच्या या जमान्यात आपल्या सर्वांनाच अनेकदा चुकीच्या प्रकारचे मेसेज ेस येत असतात. विशेषत: मुलींच्या पोस्टवर अश्लिल कमेंट्स जास्त पाहायला मिळतात. मुलांच्या तुलनेत मुलींनाही रोज घाणेरड्या मेसेजेसला सामोरे जावे लागते. समोरून अश्लिल मेसेज वगैरे यायला लागतात अशी कोणतीही पोस्ट टाकली जात नाही. हा सगळा त्रास टाळण्यासाठी इन्स्टाग्राम एक नवीन फीचर आणत आहे. इन्स्टाग्राम Flipside नावाचे फिचर आणत आहे ज्यामध्ये युजर्स आपले प्रोफाइल फ्लिप करू शकतात आणि नवीन नाव, फोटो, पोस्ट सोबत लोकांशी कनेक्ट होऊ शकतात.


Flipside फिचर काय आहे? 


इन्स्टाग्रामच्या फ्लिपसाइड फीचरअंतर्गत तुम्ही तुमच्या करंट अकाऊंटसह काही लोकांसाठी वेगळं प्रोफाइल तयार करू शकाल. म्हणजेच जुने अकाऊंट न गमावता तुम्ही आणखी एक प्रोफाईल तयार करू शकता ज्यामध्ये तुमचे नाव, प्रोफाईल पिक्चर, रील, फोटो, पोस्ट इत्यादी सर्व वेगवेगळे असतील आणि फक्त तेच लोक या सर्व लोकांना पाहू शकतील ज्यांना तुम्ही या प्रोफाईलमध्ये अॅड कराल.सध्या काही मोजक्याच युजर्सना हे फीचर मिळाले आहे. कंपनी हळूहळू ते सर्वांसाठी रोलआउट करू शकते. एक प्रकारे तुम्ही असं म्हणू शकता की, आता तुम्हाला खास लोकांसाठी दुसरं प्रायव्हेट अकाऊंट तयार करण्याची गरज नाही. आपण त्याच खात्यात इतर प्रोफाइलमधून अशा लोकांशी कनेक्ट होऊ शकता. यामुळे फेक लोकांपासून ही तुमचा बचाव होईल.


'तो' कंटेंट दिसणार नाही!


अनेकदा इंस्टाग्रामवर मुलांना कोणताही कंटेंट दाखवला जातो. या कंटेंटमुळे मुलांच्या मनावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोशल मीडियामध्ये नावाजलेली कंपनी मेटा हीने एक ब्लॉगपोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये कंपनीने लहान मुलांना प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या सेनसिटीव्ह कंटेंटच्या एक्सपोजरपासून वाचवण्यासाठी नवीन टुल्सची माहिती शेअर केली आहे. यात मेटाने म्हटले आहे की, कंपनी याच्यापुढे मुलांना सेन्सिटिव्ह कंटेंट दाखवणार नाही. सोबतच काही विशेष प्रकारच्या टर्म्स  मुलांसाठी रेस्ट्रिक्ट केलं जाणार. जर कोणचंही मुल या विषयाचा कंटेंट मेटा प्लॅटफॉर्मवर सर्च करत असेल तर कंपनी त्याला तो कंटेंट दाखवण्याच्या ऐवजी वेगळ्या पद्धतीचा कंटेन्ट दाखवला जाईल. 


इतर महत्वाची बातमी-


Republic Day Doodle : Black And White Tv ते SmartPhone; प्रजासत्ताक दिनी गुगल डुडलमध्ये बदलत्या Technology चं दर्शन