OnePlus Smartphone : 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंगसह OnePlus चा 5G स्मार्टफोन स्वस्त; लेटेस्ट किंमत किती?
OnePlus Smartphone : OnePlus Nore CE 3 Lite 5G स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.
OnePlus Smartphone : तुम्ही जर वनप्लसचे (OnePlus) चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. OnePlus Nord CE 3 Lite 5G च्या किंमतीत पहिल्यांदाच कपात करण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेतील वनप्लसचा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे जो 108MP कॅमेरा, क्वालकॉम प्रोसेसर आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे.
या OnePlus स्मार्टफोनची किंमत 2 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या ठिकाणी स्मार्टफोनची नवीन किंमत काय असेल? त्याची वैशिष्ट्य आणि फीचर्स नेमके काय असतील? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
वनप्लस फोनच्या किंमती कपात
Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोनच्या किंमतीत 2000 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. OnePlus चा हा स्मार्टफोन भारतात 19,999 रुपयांपासून लॉन्च करण्यात आला आहे.
ऑफलाइन मार्केटमध्ये या फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो आणि 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंट 21,999 रुपयांना खरेदी करता येईल.
OnePlus Nord CE 3 Lite 5G ची वैशिष्ट्ये काय आहेत?
डिस्प्ले - OnePlus Nord CE3 Lite स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.72-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. डिस्प्ले संरक्षणासाठी Asahi Dragontrail Star Glass देण्यात आली आहे.
प्रोसेसर आणि रॅम किती आहे?
OnePlus चा हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर सह सादर करण्यात आला आहे. हा फोन 8GB रॅम सह 128GB आणि 256GB स्टोरेज पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.
कॅमेरा मॉडेल कसं आहे?
OnePlus च्या स्वस्त फोनमध्ये 108MP प्राथमिक कॅमेरा आहे, जो Samsung HM6 सेन्सर आहे. प्राथमिक कॅमेऱ्यासोबत, फोनमध्ये 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. यासोबतच फोनमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी कशी असेल?
Nord CE 3 Lite स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. हा फोन 67W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येतो. तथापि, बॉक्ससोबत 80W फास्ट चार्जर उपलब्ध आहे.
महत्त्वाच्या बातम्या :