Nokia New Logo: नोकियाने कंपनीची नवीन ओळख करून देताना आपला आयकॉनिक लोगो बदलला आहे. 60 वर्षात पहिल्यन्दा कंपनीने हे पाऊल उचलले आहे. जगभरातील युजर्स बऱ्याच काळापासून याची वाट पाहत होते. फार पूर्वीपासून कंपनी आपल्या मजबूत मोबाईल फोनसाठी ओळखली जाते. इतर नवीन कंपन्यांच्या तुलनेत सध्या नोकियाच्या मोबाईल फोनची विक्री कमी झाली आहे. मात्र आता आपला लोगो बदलून कंपनीने बदलाचे संकेत दिले आहेत.


Nokia New Logo: असा आहे नवीन लोगो


नवीन नोकिया लोगोमध्ये पाच वेगवेगळ्या आकारांचा समावेश आहे. ज्यातून "NOKIA" हा शब्द तयार होतो. पूर्वी फक्त निळ्या रंगाचे ठळक आणि सामान्य शब्द कंपनीच्या लोगोत होते. पण आता यूजर्स लोगोमध्ये रंगीबेरंगी कलर (Nokia New Logo) कॉम्बिनेशन पाहू शकतात. जे सूचित करते की कंपनीचे नवीन लक्ष आता व्यवसाय तंत्रज्ञान बाजारावर असेल.






Nokia New Logo: नोकियाचे सीईओने केली मोठी घोषणा 


एका मुलाखतीदरम्यान कंपनीचे सीईओ Pekka Lundmark यांनी सांगितले की, कंपनीचे प्राधान्य आता फक्त स्मार्टफोन राहिलेले नाही. ते म्हणाले, "आता आम्ही एक व्यावसायिक तंत्रज्ञान कंपनी बनली आहे. नोकियाने आता विविध व्यवसाय पर्यायांमध्ये गुंतवणुकीसह विस्तार करण्याची योजना आखली आहे.''


कंपनी MWC Barcelona 2023 इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकते. MWC 2 मार्चपासून बार्सिलोनामध्ये सुरू होत आहे. यादरम्यान सॅमसंग, ओप्पो, विवो आणि इतर कंपन्यांच्या स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात. नुकतेच नोकियाने आपले तीन नवीन आणि बजेट स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ज्यामध्ये Nokia C32, Nokia G22 आणि Nokia C22 यांचा समावेश आहे.


Nokia G22 आणि Nokia C22 स्मार्टफोन लॉन्च


दरम्यान,  कंपनीने आपले दोन नवीन C-सीरीज हँडसेट Nokia C32 आणि Nokia C22 जगभरात लॉन्च केले आहेत. यासोबतच कंपनीने Nokia G22 देखील बाजारात लॉन्च केला आहे. या तिन्ही स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल बॅटरी उपलब्ध आहे. एक खास गोष्ट म्हणजे या हँडसेटच्या बॅटरीला एआय-पावर्ड बॅटरी सेव्हिंग मॅनेजमेंटचा सपोर्ट मिळाला आहे. याच्या मदतीने यूजर्स जास्त बॅकअप घेऊ शकतील. याबरोबरच नोकियाच्या या लेटेस्ट फोनमध्ये एचडी डिस्प्ले ते मिड-रेंज प्रोसेसर देण्यात आला आहे. Nokia C22 ची सुरुवातीची किंमत जवळपास 9,556 रुपये आहे. Nokia G22 ची सुरुवातीची किंमत जवळपास 15,694 रुपये ठेवण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Smartphone : किंमतही स्वस्त आणि फिचर्सही जबरदस्त; Nokia C32, Nokia G22 आणि Nokia C22 स्मार्टफोन जगभरात लॉन्च