Xiaomi 13 Pro India launch : चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने भारतात आपला आगामी स्मार्टफोन Xiaomi 13 Pro लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. हा लॉन्च इव्हेंट तुम्हाला Xiaomi कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आणि इतर सोशल मीडिया साईटवर थेट पाहता येईल. Xiaomi चा हा इव्हेंट आज रात्री 9:30 पासून सुरू होईल. या इव्हेंटमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केला जाईल. चीनमध्ये हा स्मार्टफोन आधीच लॉन्च करण्यात आला आहे. याची किंमत 59,200 रूपये आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत किती असेल हे आज कळेल. 


तब्बल 2 महिन्यांनंतर हा स्मार्टफोन आंतरराष्ट्रीय बाजारात होणार लॉन्च


Xiaomi चा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 2 चिपसेट सह लॉन्च केला जाईल. तब्बल 2 महिन्यांनंतर हा स्मार्टफोन आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च होत आहे. Xiaomi ग्रँड इव्हेंटचे नाव 'Behind The Masterpeace' आहे. हा लॉन्च इव्हेंट स्पेनमधील बार्सिलोना शहरात होणार आहे. यूजर्स Xiaomi च्या YouTube, Twitter, Facebook अकाऊंट आणि अधिकृत वेबसाईटवर हा कार्यक्रम पाहू शकतात.


Xiaomi 13 Pro कसा असेल?


Xiaomi 13 Pro च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, Xiaomi 13 Pro हा स्मार्टफोन 6.73 इंच 2K OLED HDR10+ डिस्प्लेसह येतो. यामध्ये यूजर्सना 120Hz चा रिफ्रेश रेट मिळतो. यात स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 50MP टेलिफोटो कॅमेरा यांसारख्या कॅमेरा सेटअपचा समाविष्ट आहे. तसेच, तुम्हाला जर व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी पाहायचे असल्यास यामध्ये सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे.


आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनला Adreno GPU सह Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेटचा सपोर्ट मिळतो. हा स्मार्टफोन Android 13 आधारित MIUI 14 कस्टम स्किनवर चालतो. पॉवरसाठी, यात 4,820mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. याशिवाय 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टही देण्यात आला आहे. या इव्हेंटमध्ये नवीन इअरबड्स आणि स्मार्टवॉचही लॉन्च केले जाऊ शकतात. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Smartphone : किंमतही स्वस्त आणि फिचर्सही जबरदस्त; Nokia C32, Nokia G22 आणि Nokia C22 स्मार्टफोन जगभरात लॉन्च