Nokia New Smartphones : Nokia च्या स्मार्टफोनची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. नुकताच Nokia कंपनीने Nokia C02 फोन बाजारात लॉन्च केल्यानंतर, HMD Global ने आता आणखी दोन नवीन C-सीरीज हँडसेट Nokia C32 आणि Nokia C22 जगभरात लॉन्च केले आहेत. यासोबतच कंपनीने Nokia G22 देखील बाजारात लॉन्च केला आहे. या तिन्ही स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल बॅटरी उपलब्ध आहे. एक खास गोष्ट म्हणजे या हँडसेटच्या बॅटरीला एआय-पावर्ड बॅटरी सेव्हिंग मॅनेजमेंटचा सपोर्ट मिळाला आहे. याच्या मदतीने यूजर्स जास्त बॅकअप घेऊ शकतील. याबरोबरच नोकियाच्या या लेटेस्ट फोनमध्ये एचडी डिस्प्ले ते मिड-रेंज प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि वैशिष्ट्य जाणून घेऊयात.


Nokia C32


1. कर्व्ह HD+ LCD


2. 50MP कॅमेरा


3. Unisoc SC9863A प्रोसेसर


4. 8MP सेल्फी कॅमेरा


5. 5000mAh बॅटरी


6. Android 13 ऑपरेटिंग सिस्टम


Nokia C32 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच वक्र HD + LCD डिस्प्ले आहे. सुरक्षिततेसाठी, यात फेस अनलॉकसह साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP मुख्य लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, तर सेल्फीसाठी 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच, Unisoc SC9863A चिपसेटसह 4GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. यात 10W जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000mAh बॅटरी आहे. या फोनची सुरुवातीची किंमत जवळपास 11,309 रुपये आहे. हा फोन चारकोल, ऑटम ग्रीन आणि बीच पिंक या कलरमध्ये उपलब्ध आहे. 


Nokia C22


1. HD+ डिस्प्ले


2. Unisoc 9863A1 चिपसेट


3. 3GB रॅम


4. 64GB स्टोरेज


5.13MP कॅमेरा


6. 8MP सेल्फी कॅमेरा


7. 5000mAh बॅटरी


8. Android 13 ऑपरेटिंग सिस्टम


Nokia C22 मध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 13MP ड्युअल कॅमेरासह 8MP सेल्फी कॅमेरा मिळत आहे. यामध्ये Unisoc 9863A1 प्रोसेसर आणि 3GB RAM सह 64GB इंटर्नल स्टोरेज आहे. ज्याला SD कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. Nokia C22 ची सुरुवातीची किंमत जवळपास 9,556 रुपये आहे.


Nokia G22


1. Unisoc T606 चिपसेट


2. 6GB रॅम


3. HD+ डिस्प्ले


4. 50MP कॅमेरा


5. 5050mAh बॅटरी


Nokia G22 मध्ये 6.5-इंचाचा HD Plus डिस्प्ले आहे. हा फोन Unisoc T606 चिपसेटसह 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. या फोनला 50MP मेन लेन्स, 2MP डेप्थ लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर मिळत आहे. Nokia G22 मध्ये 5050mAh बॅटरी आहे जी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Nokia G22 ची सुरुवातीची किंमत जवळपास 15,694 रुपये ठेवण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Infinix Smart 7 : 7,500 पेक्षा कमी किंमत आणि 6000 mAh बॅटरी; Infinix Smart 7 स्मार्टफोन लॉन्च, 'या' दिवसापासून सुरू होईल विक्री