Infinix Smart 8 Plus Price : चीनी स्मार्टफोन (Smartphone) निर्माता कंपनी Infinix ने नुकताच आपला स्मार्टफोन Infinix Smart 8 Plus भारतात लॉन्च केला आहे. या डिव्हाईसमध्ये अनेक विशेष फीचर्स देण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये 6,000mAh बॅटरी, 18W चार्जिंग सपोर्ट आणि 50MP कॅमेरा यांचा समावेश आहे.


Infinix Smart 8 Plus हे एक 4G डिव्हाईस आहे, ज्यामध्ये तुम्हाला मॅजिक रिंग फीचरची सुविधा मिळते जी आयफोनच्या डायनॅमिक आयलंडशी जुळते. स्मार्टफोनचं फीचर तर चांगलं आहेच पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आकर्षक करते ती म्हणजे या स्मार्टफोनची किंमत. या स्मार्टफोनची किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.


Infinix Smart 8 Plus ची किंमत किती? (Infinix Smart 8 Plus Price)



  • Infinix Smart 8 Plus च्या 4GB + 128GB व्हेरिएंटची भारतात किंमत 7,799 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

  • हा डिव्हाईस शायनी गोल्ड, गॅलेक्सी व्हाईट आणि टिंबर ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केला जाईल.

  • जर तुम्हाला हा फोन घ्यायचा असेल, तर त्याची पहिली सेल 9 मार्च रोजी फ्लिपकार्टवर लाइव्ह होईल.

  • कंपनी या फोनसोबत काही ऑफर देखील देत आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला SBI, HDFC, ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 800 रुपयांच्या सूटचा लाभ मिळत आहे.

  • याशिवाय तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत 1,000 रुपयांची सूट देखील मिळू शकते.


Infinix Smart 8 Plus चे स्पेसिफिकेशन्स 


डिस्प्ले - या डिव्हाईसमध्ये तुम्हाला 6.6-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले मिळेल, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 500nits पीक ब्राइटनेस आहे.


प्रोसेसर- या स्मार्टफोनमध्ये octa-core MediaTek Helio G36 प्रोसेसर आहे. यामध्ये तुम्हाला Android 13 Go वर आधारित XOS 13 मिळेल.


बॅटरी - यात 18W चार्जिंगसह 6,000mAh बॅटरी आहे.


कॅमेरा - या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस क्वाड एलईडी रिंग फ्लॅशसह 50MP प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 8MP सेल्फी शूटर आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Samsung Galaxy : दमदार बॅटरी आणि जबरदस्त लूकसह Samsung Galaxy A15 चं नवं व्हेरिएंट भारतात लॉन्च; वाचा A to Z माहिती