Samsung Galaxy : सॅमसंग मोबाईल (Samsung Smartphone) चाहत्यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमी वेगवेगळ्या रेंजचे स्मार्टफोन लॉन्च करत असते हा ट्रेंड पुढे चालू ठेवत, कंपनीने अलीकडेच आपल्या नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A15 5G चा एक नवीन व्हेरिएंट लॉन्च केला आहे.
कंपनीने याआधी हा स्मार्टफोन 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेजमध्ये सादर केला आहे. आता कंपनीने या फोनचा 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केला आहे. हा नवीन व्हेरिएंट फोनच्या अधिकृत लॉन्चच्या एका महिन्यानंतर आला आहे. या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊयात.
Samsung Galaxy A15 5G किंमत (Price)
- या फोनचे तिन्ही प्रकार खरेदीसाठी उपलब्ध आहेत. या नवीन 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हर्जनची किंमत 17,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
- या फोनवर तुम्हाला 1,500 रुपयांची सूट मिळू शकते, त्यानंतर त्याची किंमत 16,499 रुपये होईल.
- कंपनीने जुने मॉडेल डिसेंबर 2023 मध्ये लॉन्च केले होते, ज्यामध्ये 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट आहेत.
- किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 19,499 रुपये आणि 256GB स्टोरेजची किंमत 22,499 रुपये आहे.
- हे प्रोडक्ट्स किरकोळ स्टोअर्स, Samsung.com आणि इतर ऑनलाईन वेबसाईट्सद्वारे ब्लू ब्लॅक, ब्लू आणि लाईट ब्लू कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येणार आहे.
Samsung Galaxy A15 5G चे स्पेसिफिकेशन्स (Specifications)
डिस्प्ले - Samsung Galaxy A15 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 800nits पीक ब्राइटनेससह 6.5-इंच फुल-एचडी सुपर AMOLED डिस्प्ले आहे.
प्रोसेसर - या फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 6100+ चिपसेट आहे, जो 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह प्रदान केला जातो.
कॅमेरा - यामध्ये तुम्हाला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 5MP सेकेंडरी सेन्सर आणि 2MP शूटर आहे. याशिवाय, यात 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.
कनेक्टिव्हिटी ऑप्शन - कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये 5G, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB टाइप-सी पोर्ट समाविष्ट आहे. ऑनबोर्ड सेन्सरमध्ये एक्सीलरोमीटर, गायरो सेन्सर, जिओमॅग्नेटिक सेन्सर, लाईट सेन्सर आणि व्हर्च्युअल प्रॉक्सिमिटी सेन्सर यांचा समावेश आहे.
बॅटरी - या फोनमध्ये तुम्हाला 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी मिळते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे बॅटरी युनिट एका चार्जवर 21 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक वेळ प्रदान करते.
महत्त्वाच्या बातम्या :
Whatsapp New Feature : आता कोणत्याही तारखेचा मेसेज एका क्षणात पाहू शकता; Whatsapp चं भन्नाट फीचर